फोटो क्रेडीट - गुगल
Tharala Tar Mag : एकमेंकींचे केस उपटले, हाणमारी केली आणि त्यानंतर…. ‘ठरलं तर मग’ च्या सेटवर नेमकं घडलं तरी काय ?
Tharala Tar Mag BTS Video : मराठी मालिका विश्वात सध्या लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेमे पहिल्या भागापासून ते आतापर्यंत गेले साडेतीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील काही दिवासांपूर्वी एक सीन शुट झाला तो असा की, प्रिया आणि सायली यांच्यात हाणामारी होते. सायलीला प्रियाचं पितळ उघड करायचं असतं पण त्यासाठी प्रिया ही प्रतिमाची मुलगी नाही यासाठी DNA टेस्टची गरज असते. त्यासाठी सायली प्रियाशी मुद्दाम भांडण करते आणि तिचे केस काढते. या सीनचा एक BTS व्हिडीओ अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर आस्क मी खेळताना हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रियाबरोबरचा लेटेस्ट BTS व्हिडीओ शेअर कर” अशी विनंती एका चाहत्याने केली होती. म्हणूनच सायलीने म्हणजेच जुईने या धक्काबुक्कीच्या सीनचा व्हिडीओ शेअर केला होता. सायली याच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “हा सीन शूट करताना आम्ही खूप मजा केली” या पुढे जुई असं देखील म्हणते की हा सीन शुट करताना आम्हाला फार मजा आलेली आणि अर्थातच प्रेक्षकांनी देखील .याचा आनंद घेतला असेल. सायली आण प्रिया या दोन्ही व्यक्तीरेखा एकमेकींचा कितीही राग करत असल्या तरी खऱ्या आयुष्यात जुई गडकरी आणि प्रिया तेंडुलकर या खुप चांगल्या मैत्रीणी आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिका संपणार ? अभिनेत्री जुई गडकरीने केला सर्वात मोठा …
मालिकेबाबत सांगायचं तर, काही दिवसांपूर्वीच ही मालिका आता संपणार असल्याचं म्हटलं जात असतानाच जुई म्हणाली की, आता प्रियाचं पितळ उघड पडणार आहे आणि ते स्टार प्रवाहवरच्या तेरा नायिका मिळून करणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसातले हे एपिसोड प्रेक्षकांचं लक्ष वेधणार हे नक्की. यापुढे जुई असं देखील म्हणाली की, आता काहीच द्विस्ट नाहीये… प्रियाचं सत्य समोर आणण्यासाठीच आम्ही १३ जणी म्हणजेच १३ नायिका एकत्र आहोत. त्यामुळे आता प्रिया काही वाचणार नाही. तिला तिच्या पापाची शिक्षा मिळणार आहे. आमच्या सुभेदारांच्या घरातही सर्वांना समजणार आहे की, प्रिया काय आहे… तिने आजवर काय-काय केलंय. आता मी सांगू शकते The Wait Is Over!” प्रियाचा चेहरा समोर आला म्हणजे मालिका बंद होणार नाही. अजून सर्वात महत्वाचा टप्पा बाकी आहे त्यामुळे मालिका संपणार नाही, असं स्पष्टीकरण जुईने दिलं आहे. प्रियाचं खोटं समोर आणण्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीवरच्या तेरा नायिकांनी देखील पुढाकार
घेतला आहे. आता या नंतर मालिका काय नवं वळण घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.






