
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडल १२’ या सिंगिंग शोमधून आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना वेडं करणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका सायली कांबळेने तिच्या आयुष्यात अखेर गॉड मुलाचे स्वागत केले आहे. तिच्या आयुष्यातील या अत्यंत गोड आणि महत्त्वाच्या क्षणाची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. सायलीने एका छोट्या गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने बालरंजन जन्म दिला असून, गायिकेच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. तसेच तिने आणि तिच्या पतीने हे आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. सोशल मीडियावर सुंदर पोस्ट देखील शेअर केली आहे.
‘चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे…’ अपघातात ‘या’ अभिनेत्रीचा चेहरा झाला होता विद्रूप; म्हणाली…
धवल आणि सायली झाले आई-बाबा
सायलीने २४ एप्रिल २०२२ रोजी दीर्घकालीन प्रियकर धवल याच्यासोबत लग्न केले. आणि आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर सायलीने तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे स्वागत केले आहे, ज्यामुळे तिच्या आणि धवलच्या आयुष्यात नव्या ‘सुरांची मैफल’ सुरू झालेचे दिसून आले आहे. सायलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. तसेच तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी देखील त्यांचे अभिनंदन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच सायलीने तिच्या डोहाळे जेवणाचे अतिशय सुंदर फोटो शेअर केले होते. जे पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली.
डोहाळे जेवण देखील उत्साहात पडला पार
सायली डोहाळे जेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यात तिचा मराठमोळा थाट आणि मातृत्वाचा ग्लो स्पष्टपणे दिसून आला. सायलीने हिरव्या रंगाची साडी, पारंपरिक नथ आणि फुलांचे आकर्षक दागिने परिधान केले होते, ज्यामध्ये ती खूप सुनंद दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील मातृत्व आणि तिच्या पतीच्या चेहऱ्यावरील आनंद, हे सगळे क्षण कॅमेऱ्यात अगदी स्पष्ट कैद झाले होते.
आता लहान पाहुणा घरी आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गायन क्षेत्रात मोठी उंची गाठलेल्या सायलीसाठी आई होण्याची भूमिका तिच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. आतापर्यंत आपल्या स्वरांनी लाखो लोकांना आनंद देणाऱ्या सायलीच्या घरी, आता पाळणागीतांची गोड धून ऐकायला मिळणार आहे. सायली आणि धवल यांच्यावर सोशल मीडियावर सध्या शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.