
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नुकतेच काही दिवसांआधी अभिनेत्री तेजश्री प्रधान वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका सोडणार आहे असल्याचे समोर आले होते. या चर्चेनंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांनी लगेच नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान तेजश्रीनं पोस्ट शेअर करत या चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट केले. आणि आणखी एक अभिनेत्रीची बातमी समोर आली आहे. आता ती बातमी खरी आहे की खोटी? हे आपण जाणून घेणार आहोत.
तेजश्रीनंतर आता स्टार प्रवाहची प्रसिद्ध अभिनेत्री देखील मालिकेला रामराम करत असल्याची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील मुख्य नायिका ईशा केसकर असल्याचे समजले आहे. ईशा मालिकेतून एक्झिट होणार आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. तसेच या बातमीमुळे चाहते नाराज झाले आहेत. आता या मगच कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा नवा अध्याय सुरु होणार आहे. आणि हा नवा अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये राहुल आणि रोहिणी यांचा पर्दाफाश करायला गेलेल्या कलाचा रस्त्यात अपघात होतो आणि याच वेळी सुकन्या या नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री दाखवण्यात आली आहे. आता या मालिकेत पुढे काय घडते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
सुकन्याचं चांदेकरांच्या घराशी काहीतरी खास कनेक्शन आहे. पण ही सुकन्या कोण हे अद्याप समोर आलेलं नाही. याच नोट मालिकेची स्टोरी बदलणार असल्याचं दिसतंय. कलाचा मालिकेत अपघात होतो. त्यानंतर सुकन्या देखील हॉस्पिटलमध्ये असल्याचं प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. सुकन्या म्हणजेच अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर हिने मालिकेत एन्ट्री घेणार आहे. मालिकेचा नवा अध्याय म्हणजेच ईशा केसकर आता मालिकेत दिसणार नाही, तिच्या ऐवजी नक्षत्रा मेढेकर तिची जागा घेणार अशा चर्चा सुरू झाल्या आहे. ईशा केसकरची मालिकेतून एक्झिट होतेय अशा चर्चा सुरू होताच तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भारताचे Miss Universe 2025 चे स्वप्न राहिले अपुरे, २२ वर्षीय मनिका विश्वकर्मा टॉप १२ मधून पडली बाहेर
अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरसोबत मालिकेचा नवा अध्याय सुरू होतोय. अशातच अद्वैतची आई सरोज चांदेकर म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पटवर्धन यांनीही एक व्हिडीओ शेअर केला आहे. “आमच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत नवा अध्याय सुरू होतोय. कथानक वेगळं वळण घेतंय. तुम्ही पाहिलं असेल एक नवा चेहरा मालिकेच्या कुटुंबात सहभागी होतोय.” या व्हिडीओनंतरही ईशा केसकर मालिका सोडणार या चर्चांना आणखी दुजोरा मिळाला आहे.