Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या टीमचा शाळेत खास उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी हा ठरला अविस्मरणी दिवस

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक येथील राणी लक्ष्मीबाई प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत चित्रपटाच्या टीमकडून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 20, 2025 | 04:31 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी शाळा, मातृभाषा आणि संस्कार यांचा मुद्दा प्रभावीपणे मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. वेगळ्या शैलीत प्रमोशन करत, या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण केली आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमने शाळांशी नाते जोडले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा एका शाळेत पार पडला होता. विशेष म्हणजे, याच शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चे चित्रीकरण करण्यात आले होते. शाळेच्या वर्गखोल्या, मैदान आणि त्या वातावरणातच चित्रपटाचा ट्रेलर सादर करून टीमने या चित्रपटाची झलक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

याच सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवेचा पुढचा टप्पा म्हणून चित्रपटाच्या टीमने आणखी एक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक येथील राणी लक्ष्मीबाई प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत चित्रपटाच्या टीमकडून स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. ही शाळा बेसमेंट एरियामध्ये असून सर्व महिला शिक्षक आणि सफाई कर्मचारी यांनी मिळून ही शाळा सुरू केली आहे. स्वच्छतेतून समाजजागृती करणाऱ्या संत गाडगेबाबांच्या विचारांना अभिवादन करत, या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या स्वच्छता अभियानात चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह निर्मात्या क्षिती जोग व प्राजक्ता कोळी, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार प्रत्यक्ष सहभागी झाले होते. कलाकार आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेचा परिसर स्वच्छ केला. तसेच शाळेच्या भिंती ही रंगवल्या. भिंतींवर विविध रंगसंगतीतून साकारलेल्या चित्रकलेमुळे शाळेचे रूप अधिक खुलले. स्वच्छता अभियानानंतर कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, दिलखुलास गप्पा मारल्या. यानंतर कलाकारांनी विद्यार्थ्यांसोबत बसून जेवणाचाही आस्वाद घेतला. या सगळ्या क्षणांमुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अविस्मरणीय ठरला.

Neha Kakkar ने अश्लीलतेचा गाठला कळस, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; म्हणतात ‘हिला आवरा आता कोणीतरी…’

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “शाळा म्हणजे फक्त अभ्यासाची जागा नाही, तर आयुष्य घडवणारी संस्कारांची शाळा आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांच्या पुण्यतिथीला विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता अभियान राबवताना मनापासून समाधान वाटते. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपटही हाच विचार मांडतो. आपली भाषा, आपली शाळा आणि आपले संस्कार जपणे आज खूप गरजेचे आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास या शाळेसाठी देणगी स्वरूपात एक रक्कम आमच्याकडून दिली जाईल.”

Dharmendra शेवटच्या क्षणी काय करत होते? Video Viral, ‘या’ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली क्लिप

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, निर्मिती सावंत आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन  आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Web Title: Krantijyoti vidyalaya marathi medium film teams special initiative at a school makes the day unforgettable for students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • marathi movie
  • Prajakta Koli

संबंधित बातम्या

‘उत्तर’चा भावनिक इफेक्ट! पुण्यातील अनोख्या प्रयोगामुळे आई-मुलांचं नातं पुन्हा घट्ट झालं
1

‘उत्तर’चा भावनिक इफेक्ट! पुण्यातील अनोख्या प्रयोगामुळे आई-मुलांचं नातं पुन्हा घट्ट झालं

Dashavatar : दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाचा अनुभव झी मराठीवर, मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता घराघरात
2

Dashavatar : दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाचा अनुभव झी मराठीवर, मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता घराघरात

परक्या देशात नवऱ्याच्या शोधात निघाली कावेरी; ‘कैरी’ चित्रपटातील सायली संजीवची लक्ष्यवेधी भूमिका
3

परक्या देशात नवऱ्याच्या शोधात निघाली कावेरी; ‘कैरी’ चित्रपटातील सायली संजीवची लक्ष्यवेधी भूमिका

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह
4

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.