
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!
शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी “लास्ट स्टॉप खांदा… ” प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच प्रेक्षकांचं या चित्रपटातून भरभरून मनोरंजन होणार यात शंकाच नाही.
चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे आपल्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाचं छायांकन हरेश सावंत यांचं असून कलादिग्दर्शक केशव ठाकुर आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे.
इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी
प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर ‘लास्ट स्टॉप खांदा… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी, फ्रेश जोडी या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. उत्तम कथानक, खुसखुशीत संवादाची फोडणी असलेल्या या चित्रपटाला श्रवणीय संगीताचीही साथ आहे. एक तरुण आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट असली, तरी प्रत्येकालाच आपलीशी वाटेल अशीच ही गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता २१ नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.