(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
Avika Gor Wedding: ‘बालिका वधू’ अभिनेत्रीची सुरु झाली लगीन घाई, खास अमेरिकेवरून आली मेहंदी आर्टिस्ट
“आवारापन २”चे शूटिंग सुरु
नितीन कक्कर दिग्दर्शित आणि बिलाल सिद्दीकी यांनी लिहिलेला, “आवारापन २” विशेष फिल्म्स अंतर्गत विशेष भट्ट निर्मित करत आहेत. सध्या बँकॉकमध्ये पहिले शूटिंग शेड्यूल सुरु झाले आहे. इमरान हाश्मी आणि निर्माता विशेष भट्ट यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. आता, निर्मात्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीबद्दल माहिती शेअर केली आहे. तसेच ही पोस्ट पाहून चाहते त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
चाहते या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत
हा चित्रपट शिवमचा “आवारापन” मधील प्रवास पुढे घेऊन येणार आहे की निर्माते दुसऱ्या भागात नवीन कथा सादर करतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या, चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण त्यांनी वारंवार “आवारापन” चा सिक्वेल बनवण्याची मागणी केली आहे. निर्मात्यांनी इमरान हाश्मीच्या वाढदिवशी “आवारापन २” ची घोषणा केली तेव्हा चाहते खूप उत्सुक होते. “आवारापन २” चे चित्रीकरण सुरू असल्याने, चाहत्यांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह आणखी वाढला आहे. “आवारापन २” ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या-आराध्याची एंट्री; भावूक चाहतीचे अश्रू पुसताना व्हिडीओ व्हायरल
“आवारापन” २००७ मध्ये प्रदर्शित झाला
“आवारापन” चे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले होते. इमरान हाश्मी व्यतिरिक्त, या चित्रपटात आशुतोष राणा, श्रिया सरन, मृणालिनी शर्मा आणि पूरब कोहली यांनीही मुख्य भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या होत्या. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नव्हता, परंतु नंतर तो लोकप्रिय झाला. त्याची गाणी आजही लोकप्रिय आहेत. आता “आवारापन २” चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






