Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विरोधानंतर ‘मना’चे श्लोक आता नवीन नावासह प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अखेर अनेक विरोध आणि अडचणीचा सामना केल्यानंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा ‘मना’चे श्लोक पुन्हा नवीन नावासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नवे नाव काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 15, 2025 | 08:57 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘मना’चे श्लोक आता ‘तू बोल ना’ नावाने प्रदर्शित
  • १६ ऑक्टोबर रोजी चित्रपट सिनेमागृहात सज्ज
  • चित्रपटाच्या टीमने नवीन नाव केले जाहीर

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे लिखित ‘मना’चे श्लोक आता नव्या नावासह चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे नवे नाव निर्मात्यांनी अखेर जाहीर केले आहे. चित्रपटाला नवे नाव ‘तू बोल ना’ हे देण्यात आले आहेत. तसेच आता नव्या नावानं, नव्या उत्साहात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

याआधी या चित्रपटाचे नाव ‘मना’चे श्लोक’ असे होते. परंतु, सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि हा चित्रपट रिलीजआधीच अडचणीत आला.

‘मना’चे श्लोक’ चित्रपटगृहात प्रदर्शित होताच वादात सापडला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, काही लोकांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी “मनाचे श्लोक” चे थिएटर प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शक मृण्मयी यामुळे खूप निराश झाली आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचे पोस्टर्स देखील फाडण्यात आले. आता या सगळ्याप्रकारणी अभिनेत्री मृण्मयीने मोठा निर्णय घेतला.

५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज “कांतारा चॅप्टर १”, १३ व्या दिवशी चित्रपटाचा नवा रेकॉर्ड

या सगळ्या गोंधळानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी नव्या नावासह, नव्या जोमानं चित्रपट पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला. आणि आता चित्रपट नव्या नावासह नव्या उत्साहात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

याबदल चित्रपटाचे निर्माते म्हणाले, ”गेले काही दिवस आमच्यासाठी कठीण काळ होता, परंतु रसिक प्रेक्षक, समाजमाध्यमं आणि हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीचा अभूतपूर्व पाठिंबा आम्हाला खूप बळ देऊन गेला. त्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा नव्या नावानं, नव्या ऊर्जेनं चित्रपट प्रदर्शित करत आहोत. रसिकांना आता हा चित्रपट सुविहित पाहाता येईल.” आता हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Hrithik Roshan ची ‘Personality Right’ साठी न्यायालयात धाव! फोटो, आवाज आणि व्हिडिओंच्या अनधिकृत वापराला आव्हान

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहेत. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ‘तू बोल ना’ हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रदर्शित होणार असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत.

Web Title: Mrunmayee deshpande manache shlok movie new name is tu bol na will be released on 16 october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 08:57 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज “कांतारा चॅप्टर १”, १३ व्या दिवशी चित्रपटाचा नवा रेकॉर्ड
1

५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज “कांतारा चॅप्टर १”, १३ व्या दिवशी चित्रपटाचा नवा रेकॉर्ड

नेरुळमध्ये पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंजुळा बिल्डिंग परिसरातील नागरिक हैराण
2

नेरुळमध्ये पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंजुळा बिल्डिंग परिसरातील नागरिक हैराण

MTV चे पाच म्युझिक चॅनल्स होणार बंद? पॅरामाउंटचा मोठा निर्णय, काय आहे यामागचं कारण?
3

MTV चे पाच म्युझिक चॅनल्स होणार बंद? पॅरामाउंटचा मोठा निर्णय, काय आहे यामागचं कारण?

“एक चोरीचा चित्रपट…” ‘लापता लेडीज’ ला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल संतापले ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक
4

“एक चोरीचा चित्रपट…” ‘लापता लेडीज’ ला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल संतापले ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.