Hrithik Roshan ची 'Personality Right' साठी न्यायालयात धाव! (Photo Credit - X)
नवी दिल्ली: बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आता त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे (Personality Rights) संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे. हृतिकने याचिका दाखल करून विनंती केली आहे की, त्याचे फोटो, नाव, व्हिडिओ आणि आवाज त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यावसायिक किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरला जाऊ नये.
Bollywood actor Hrithik Roshan moves the Delhi High Court seeking protection of his personality rights. HC to hear the matter tomorrow. @iHrithik #PersonalityRights pic.twitter.com/2ztLX7n6kV — Bar and Bench (@barandbench) October 14, 2025
शिल्पा शेट्टीचा परदेशी दौरा बंद! “आधी भरा ६० कोटी, करा सही आणि मग फिरा देशाबाहेर”
हृतिक रोशनच्या आधी अनेक बॉलीवूड आणि टॉलीवूड सेलिब्रिटींनी अशाच प्रकारच्या अनधिकृत वापराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, करण जोहर आणि नागार्जुन यांचा समावेश आहे. अलीकडेच गायक कुमार सानू यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
फारसा बॉलिवूडमध्ये दिसत नसला तरी, 1200 कोटींचा मालक! विवेक ओबेरॉयने स्वतः सांगितला सक्सेस मंत्र…