Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘असंभव’ चित्रपटात मुक्ता बर्वेनंतर नव्या अभिनेत्रीची एन्ट्री, सचित पाटिलसोबत करणार पहिल्यांदाच काम!

मराठीतला आगामी सिनेमा ‘असंभव’ शुटिंग सध्या नैनीतालमध्ये सुरू आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सचित पाटील हे दोघं मुख्य भूमिकेत आहे. मात्र या सिनेमात आता आणखी एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटिस आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 14, 2025 | 05:38 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. नुकताच या दोघांचा आगामी चित्रपट ‘असंभव’ चा मुहूर्त नैनीताल येथे यशस्वीरीत्या पार पडला आहे. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटामध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

‘असंभव’ या सिनेमामध्ये कोणत्या नव्या चेह-याची एन्ट्री होणार आहे. हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. खरंतर ही व्यक्ती मुक्ता बर्वेची लाडकी मैत्रिण असून पहिल्यादांच सचित पाटिलसोबत काम करताना झळकणार आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून अभिनेत्री प्रिया बापट आहे. या सिनेमात आता प्रिया बापटच देखिल नाव जोडलं गेलं आहे. २०१८ ला ‘आम्ही दोघी’ या चित्रपटनंतर आता पुन्हा एकदा मुक्ता बर्वे आणि प्रिया बापटचा अभिनय प्रेक्षकांना आगामी सिनेमा ‘असंभव’मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

 

सादगी और शानो-शौकत का मेल हो तुम; काले रंग में चाँदनी का खेल हो तुम…

सध्या तरी सोशल मिडियावर प्रिया बापटच्या एन्ट्रीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री ‘वो आगायी वो आगायी…’ असं म्हणत एक रोमाँन्टिक म्युझिक प्ले होत आणि प्रिया पळत जाऊन मुक्ताला मिठी मारताना दिसत आहे. प्रियाने आपल्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ती पहिल्यांदाच सचित पाटिलसोबत काम करत आहे. ‘असंभव’ या सिनेमामूळे नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच एकत्र आल्या आहेत.

वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, ‘अलिबाबा’ आणि ‘चाळीशीतले चोर’ ते ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ या आगामी सिनेमाला लाभणार आहे. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर अभिनेता सचित पाटील निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तसेच निर्माते शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या यशानंतर हे ‘असंभव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ‘नाच गं घुमा’ नंतर आता या चित्रपटापासून चाहत्यांना खूप आशा आहे.

महाकुंभमेळ्यात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केलं शाही स्नान; म्हणाला “जोवर तो बोलवत नाही तोवर…”

याचदरम्यान ‘हाय काय नाय काय’, ‘उबुंटू’ या सिनेमानंतर आता दिग्दर्शक आणि अभिनेते पुष्कर श्रोत्री ‘असंभव’ या सिनेमाचं देखिल दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी आता चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट अजूनही समोर आलेली नसून, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक मनोरंजनाचे नवे साधन ठरणार आहे.

मुक्ता बर्वे आणि सचित पाटील हे मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. यांना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. इतक्या ताकदवर कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Web Title: Priya bapat will now make her entry in the marathi film asambhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • marathi cinema

संबंधित बातम्या

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस
1

स्वराज्याचा हुंकार मोठ्या पडद्यावर! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ प्रेक्षकांच्या भेटीस

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
2

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…
3

‘.. आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शंभरावा चित्रपट’, अभिनय कारकिर्दीत प्रसाद ओकची शंभरी; म्हणाला…

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
4

अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.