मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी सई सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. काही तासांपूर्वीच सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर ब्लॅक साडीमध्ये सुंदर फोटोशूट शेअर केले.
Sai Tamhankar Photos
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
आज मकरसंक्रांत.... नवीन वर्षातील हा पहिला सण आहे. या खास सणानिमित्त अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीने सुंदर स्टायलिश ब्लॅक साडी नेसून फोटोशूट शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये, सईने स्टायलिश ब्लॅक साडी आणि ब्लाऊज कॅरी करून कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.
अभिनेत्रीने फुल्ल स्लिव्हज ब्लाऊज वेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.
सिंपल हेअर स्टाईल करून अभिनेत्रीने कान साखळी वेअर केली आहे. शिवाय वेणीलाही त्याचे ब्राऊच लावले आहेत. सिंपल लूकवर तिची ही कान साखळी सुंदर दिसते.
लूकला साजेसा मेकअपमध्ये सई खूपच सुंदर दिसत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.