Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर

Gondhal Movie: मराठी चित्रपट ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यावर आता दिग्दर्शक संतोष डावखरांनी ‘आधी चित्रपट पाहा’ म्हणत उत्तर दिलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2026 | 11:00 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यप नाराज
  • दिग्दर्शक संतोष डावखरांनी पोस्ट करत दिले उत्तर
  • ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर नेमका वाद काय?
Gondhal Movie:  मराठी चित्रपट ‘गोंधळ’ सध्या ऑस्करच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. चित्रपटाची ऑस्करसाठी झालेली निवड आणि त्यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी व्यक्त केलेली नाराजी यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. अनुराग कश्यपांच्या वक्तव्यानंतर आता ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘ऑस्करसाठी भारत चुकीचे चित्रपट निवडतो’, अनुराग कश्यपांचं वक्तव्य

अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीदरम्यान ऑस्करसाठी भारताकडून होणाऱ्या चित्रपटांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली. ऑस्करसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताकडून अनेकदा चुकीच्या चित्रपटांची निवड केली जाते, असं त्यांनी म्हटल्याचं सांगितलं जात आहे.

त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. यानंतर ‘गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून अनुराग कश्यपांना उत्तर दिलं.

‘आधी चित्रपट पाहा’, संतोष डावखरांचा सल्ला

संतोष डावखर यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वांना आधी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी अनुराग कश्यप यांच्यासोबत झालेल्या जुन्या भेटीचाही उल्लेख केला.

संतोष यांच्या म्हणण्यानुसार, २६ एप्रिल रोजी बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या विमानात त्यांची आणि अनुराग कश्यप यांची भेट झाली होती. संतोष यांनी सांगितलं की, ते अनुराग कश्यप आणि त्यांच्या चित्रपटांचा खूप आदर करतात.

या भेटीदरम्यान रात्री सुमारे ११.५५ वाजता त्यांनी स्वतः अनुराग कश्यप यांना आपल्या ‘गोंधळ’ चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी अनुराग यांनी आपण या चित्रपटाबद्दल याआधी ऐकलंही नाही आणि तो पाहिलाही नसल्याचं सांगितलं होतं.

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

‘चित्रपट पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं’

संतोष यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर अनुराग कश्यप यांनी ‘गोंधळ’ पाहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर मुंबईत हा चित्रपट कुठेही प्रदर्शित किंवा दाखवला गेला नसल्याचं संतोष यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याच मुद्द्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित करत, चित्रपट पाहिलाच नसेल तर त्याला चुकीचा कसा ठरवता येईल? असा सवाल केला. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी प्रेक्षक आणि समीक्षकांनी चित्रपट पाहावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

‘गोंधळ’ आहे मानसशास्त्रीय थरारपट

संतोष डावखर यांनी ‘गोंधळ’ हा मानसशास्त्रीय थरारपट असल्याचं स्पष्ट केलं आहे. मराठी संस्कृतीचा गाभा आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करणारा विषय लक्षात घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच हा चित्रपट कोणत्याही प्रतिष्ठित चित्रपट कुटुंबातील व्यक्तीने तयार केलेला नसून, चित्रपटसृष्टीबाहेरील एका नव्या आणि उत्साही निर्मात्याने बनवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

‘गोंधळ’ ओटीटीसाठी नव्हे, मोठ्या पडद्यासाठी

संतोष यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘गोंधळ’ हा केवळ छोट्या पडद्यासाठी किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेला चित्रपट नसल्याचंही सांगितलं. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना चित्रपटाचा अनुभव मिळावा, यासाठी तो तयार करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.

ऑस्करसारख्या जागतिक मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आपल्याला पूर्णपणे समजते, असंही संतोष यांनी म्हटलं आहे.

आता ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवरून सुरू झालेल्या या चर्चेत पुढे आणखी कोणत्या प्रतिक्रिया येतात आणि अनुराग कश्यप यावर पुन्हा काही बोलतात का, याकडे चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Gondhal movie oscar selection anurag kashyap santosh davakhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Entertainemnt News
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
1

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री
2

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस
3

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
4

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.