Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वागतासाठी मनाची आणि घराची दारं उघडा…’, रितेश भाऊ लवकरच घेऊन येत आहे महाराष्ट्राचा लोकप्रिय शो!

कलर्स मराठीवर लवकरच आता चाहत्यांचा लोकप्रिय शो सुरु होणार आहे. जो रितेश देशमुख घेऊन येत आहे. होय, बिग बॉस मराठी सिझन ६ चा नवा प्रोमो समोर आला आहे. जो पाहून चाहते खुश झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 14, 2025 | 11:04 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रितेश भाऊ लवकरच घेऊन येत आहे लोकप्रिय शो
  • बिग बॉस मराठीचा नवा सिझन ६ कधी होणार प्रदर्शित
  • बिग बॉस मराठी सिझन ६’ साठी चाहते उत्सुक
 

“स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” असं म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी चा नवा सिझन ६. ‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच विषय, एकाच धमाकाच्या चर्चा होत आहे. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ची सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…आहात ना तय्यार!” भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नव्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सिझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सिझनमध्ये Swag तोच असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे.

Roomani Khare Engaged: संदीप खरेंच्या मुलीचा पार पडला साखरपुडा, ‘हा’ मराठी अभिनेता होणार खरे कुटुंबीयांचा जावई

आता शोचा पॅटर्न काय असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण येणार? हे सगळं अजून गुलदस्त्यात आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ येत्या नवीन वर्षात ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच रितेशचे होस्टिंग पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या भागात कोण कोणते स्पर्शक सहभागी होणार हे देखील अद्यापही समजलेले नाही आहे. ‘बिग बॉस’चा हा नवा सिझन धमाका करेल हे नक्की आहे.

 

भाऊच्या एन्ट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीचे वातावरण, ढोल–ताशांचा गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल २५० ते ३०० लोकांची दणदणीत उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने पार पडला बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा लार्जर-दॅन-लाईफ प्रोमो. रितेश भाऊने पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषा केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा दिसणारा स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या नव्या प्रोमोने बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची उत्सुकता वाढवली आहे. दरम्यान, सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे आणि चर्चेत आहेत प्रोमोमधले रितेश भाऊंचे कडक डायलॉग… घरात कुणाचा नवस पूरा होणार? तर कुणाच्या सलामीने वातावरण झिंगणार? “काही असे हि असणार… पण, मी गप्प नाही बसणार…! अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत लवकरच!’ असे या प्रोमोमध्ये बोलताना दिसला आहे.

‘पुष्पा २’ आणि ‘सैयारा’ ला मागे टाकत ‘Dhurandhar’ सुस्साट, अवघ्या ९ दिवसात बनवला मोठा रेकॉर्ड; जाणून घ्या Collection

या सिझनमुळे महाराष्ट्राला नक्की वेड लागणार आहे. बिग बॉस मराठी सिझन ६ प्रेक्षकांना ११ जानेवारीपासून पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अनेक कलाकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. फिनालेपर्यंत सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आणि सुरज चव्हाण उभे राहिले होते. यात सुरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. आणि तो त्याच्या नावावर ही मोठी ट्रॉफी करून गेला.

Web Title: Riteish deshmukh is soon bringing the popular show of maharashtra bigg boss marathi season 6

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • entertainment
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Roomani Khare Engaged: संदीप खरेंच्या मुलीचा पार पडला साखरपुडा, ‘हा’ मराठी अभिनेता होणार खरे कुटुंबीयांचा जावई
1

Roomani Khare Engaged: संदीप खरेंच्या मुलीचा पार पडला साखरपुडा, ‘हा’ मराठी अभिनेता होणार खरे कुटुंबीयांचा जावई

साधा लूक अन् चेहऱ्यावर निराशा…, सुनील पाल यांना नक्की झाले तरी काय? कॉमेडियनची बारीक अवस्था पाहून चाहते थक्क
2

साधा लूक अन् चेहऱ्यावर निराशा…, सुनील पाल यांना नक्की झाले तरी काय? कॉमेडियनची बारीक अवस्था पाहून चाहते थक्क

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!
3

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?
4

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.