
Jahnavi Killekar On Trollers: ‘नवरा विकला का काय?’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गणपतीच्या पहिल्या दिवशी जान्हवीने एकदम साधा लूक केला होता. मेकअप नव्हता, कपाळावर टिकली, गळ्यात मंगळसूत्र आणि सुंदर साडी. तिने देवासमोर हात जोडून फोटो टाकले होते. त्यावर एकाने कमेंट केली की ‘नवरा विकला का काय?’. दुसऱ्या दिवशी तिने आणि तिच्या जाऊबाईंनी मिळून ‘सण गौरी गणपतीचा आला’ गाण्यावर रिल बनवली. त्यात त्या नाचत होत्या. बस, एवढ्यावरून लोकांनी तिला पकडलं. कमेंट करायला लागले की देवाकडे पाठ करून नाचताय, लाज नाही वाटत का?
या सगळ्या ट्रोलिंगवर जान्हवीने एक व्हिडिओ बनवून उत्तर दिलं आहे. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “हाय, हॅलो नमस्कार. आजचा हा व्हिडिओ माझ्या ट्रोलर्ससाठी आहे. खरंतर मला आज प्रचंड हसायला येतंय. मला अजिबात वाईट वाटत नाहीये, कारण तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही चुका काढायच्याच असतात.
“ती पुढे म्हणाली, “पहिल्या दिवशी साधा लूक केला, देवासमोर हात जोडले, तर नवरा विकला का अशी कमेंट करता. दुसऱ्या दिवशी नाचले तर देवाकडे पाठ करून नाचते म्हणता. काहीतरी पटेल असं तरी बोला.”
जान्हवी इथेच थांबली नाही. ती म्हणाली की हेच लोक गणपती विसर्जन, दहीहंडी, नवरात्रीत देवीसमोर बायकांना नाचवतात. तेव्हा चालतं का? तेव्हा देवाकडे पाठ नसते का? पण जान्हवीने नाचलं की लगेच ज्ञान द्यायला येतात.
जान्हवीने स्पष्ट सांगितलं की तिला या ट्रोलिंगचा काहीच फरक पडत नाही. ती म्हणाली, “तुम्हाला जे करायचंय ते करा. मी माझं आयुष्य आनंदाने जगतेय. देव माझ्या पाठीशी आहे. मी यशस्वी आहे. तुमच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही.” ती पुढे म्हणाली, “जेव्हा सार्वजनिक गणपतीचं विसर्जन असतं तेव्हा लोक देवासमोरच नाचतात ना? तेव्हा देवाकडे पाठ करूनच नाचतात ना? मग तेव्हा का नाही बोलत?” शेवटी ती म्हणाली, “तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे बघायला माझ्याकडे वेळ नाही. माझ्यावर प्रेम करणारे खूप चाहते आहेत. मला माझा वेळ त्यांना द्यायला आवडेल. बाप्पाकडे प्रार्थना करेन की तुमच्यासारख्या लोकांना सद्बुद्धी देवो.”
हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आता परत वाईट कमेंट्स येणार… म्हणून कमेंट सेक्शन ऑफ करतेय.” जान्हवीचा हा बिंदास्त अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचं म्हणणं पण बरोबर आहे, सणाच्या वेळी आनंदाने नाचणं यात वाईट काय आहे? पण ट्रोलर्सना तर फक्त कारण लागतं. जान्हवीने मात्र त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन तोंड बंद केलं आहे..”