
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाला सुरूवात झाली असून घरात रोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहेत. आता प्रेक्षक या सीझनचा पहिला भाऊचा धक्क्याची वाट पाहत होते. आज 17 जानेवारी पहिलाी भाऊचा धक्का पार पडणार आहे. या सीझनमध्ये काही स्पर्धकांनी पहिल्याच आठवड्यात घरात धुमाकूळ घातल्याचं आपण पाहिले. यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय बनली ती म्हणजे तन्वी कोलते. पहिल्या दिवसापासून तन्वी घरात मोठ्यांशी उद्धट बोलताना दिसली, मनासारखं झालं नाहीतर रडत होती. या सगळ्याचा आढावा आज रितेश भाऊ घेणार आहे. या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख कोणा कोणाची शाळा घेणार हे पाहणं म्हत्त्वाचे ठरणार आहे.
आता या आठवड्याचा तसेच या सीझनच्या पहिल्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉस मराठी सीझन ६ पहिला आठवडा गाजवणाऱ्या स्पर्धकांची रितेश देशमुख चांगलीच कानउघडणी करणार आहेत. तन्वी कोलतेने सागर कारंडेच्या प्रोफेशनवर सुद्धा भाष्य केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र भाऊच्या धक्कावर काय बोलणार याची आतुरतेने वाट पाहत होते.. अखेर तो क्षण आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. पहिल्याच धक्क्यावर रितेश तन्वीला काय म्हणाला हे पाहुयात..
या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, सगळ्यात आधी रितेशने तन्वीच्या गेमप्लॅनची पोलखोल केली आहे. संपूर्ण आठवडा प्रेक्षक देखील याबद्दल चर्चा करत होते. पहिली गोष्ट म्हणजे तन्वी खूप अती बोलते.. मग भांडायला सुरूवात करते आणि शेवटी सगळं झालं की रडते यावरूनच रितेशने तन्वीला चांगलंच खडसावलं आहे.
यावेळी रितेश तन्वीला बोलतो, ”तन्वी कोलते किती बोलते! तुम्ही या घराच्या तंटा क्वीन आहात. तुम्हाला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की रडायचं असतं. तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे..”
यावर तन्वीने स्वत: ची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते पण रितेश तिचं काही ऐकून घेत नाही. यामुळे रितेश आणखी भडकला. तो तिला थेट म्हणाला, ” मी बोलतोय ना… थांबा एक मिनिट”
या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. इतकं भारी वाटतंय हा प्रोमो पाहून”, “याचीच गरज होती बरं झालं” अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी रितेश भाऊंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. दरम्यान, तन्वी कोलतेवर मात्र जोरदार टीका होताना दिसतेय. “भांडण केल्यावर बिग बॉस जिंकता येतं असं वाटतंय तिला”, “तन्वी कोलते किती बोलते रे बाबा”, “तन्वी आता तंटा क्वीन झालीये”, “सायको आहे तन्वी” अशा थेट आणि आक्रमक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.