(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर काही दिवसांपूर्वी छावा चित्रपटामुळे चर्चेत आला होता. छावा चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुक देखील करण्यात आले होते, मात्र त्याचदरम्यान संतोष जुवेकरला ट्रोल करण्यात आले.
संतोष जुवेकरला नुकत्याच एका मुलाखतीत त्याला ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले,यावर संतोष म्हणाला ‘“२२ वर्षं झाली या क्षेत्रात काम करतोय; पण इतकी वर्षं केलेल्या कामातून जी प्रसिद्धी मिळाली नाही. ती प्रसिद्धी यामुळे मिळाली ‘छावा चित्रपट आला तेव्हा मला खूप ट्रोल केलेलं. त्यावेळी मी एका चॅनेलसाठी मुलाखत दिलेली आणि त्यामधील काही भाग काढून, माझ्या भावना खूप चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या गेल्या’
हॉरर, सस्पेन्सने भरलेल्या ‘काजळमाया’ मालिकेतील चेटकिणीची मुख्य भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री
ट्रोलिंगबद्दल बोलताना संतोष जुवेकर म्हणाला,” ज्यांनी ती मुलाखत पूर्ण पाहिली, त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की, आम्हाला काहीच चुकीचं वाटलं नाही, तू योग्य बोलला आहेस. पण, ज्यांना थोडंसंच बघून, ट्रोल करण्याची खूप घाई असते, त्यांनी त्या मुलाखतीतील अर्धवट भाग पाहिला.
‘बॅटल ऑफ गलवान’च्या सेटवर सलमान खान जखमी? थांबवले शूटिंग, ब्रेकनंतर परतणार अभिनेता
‘छावा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान संतोष जुवेकरने अनेक मुलाखती दिल्या होत्या. त्यात एक मुलाखत अशी होती, ज्यामध्ये त्याने चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेले अभिनेता अक्षय खन्ना यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली.तसेच, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसलेल्या विकी कौशलबरोबर काम करण्याचा अनुभवही संतोषने शेअर केला.
अभिनेता संतोष जुवेकर सध्या घाशीराम कोतवाल या हिंदी नाटकाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ नाटक हिंदी भाषेमध्ये रंगभूमीवर प्रदर्शित होणार आहे. या नाटकामध्ये संतोष जुवेकर घाशीराम कोतवालच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सुप्रसिद्ध अभिनेता संजय मिश्रा नाना फडणवीसची भूमिका साकारत आहेत.