(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
काजळमाया या मालिकेत अभिनेत्री रूची जाईल ही मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. या मालिकेत रूची जाईल ही पर्णिका नावाच्या चेटकिणीची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री रूची जाईलची ही पहिलीवहिली मालिका आहे. या भूमिकेविषयी रूची म्हणाली, “काजळमाया’ ही माझी पहिलीवहिली मालिकाआहे; त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री होण्याचं माझं स्वप्न या मालिकेच्या निमित्तानं पूर्ण होत आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’च्या सेटवर सलमान खान जखमी? थांबवले शूटिंग, ब्रेकनंतर परतणार अभिनेता
काजळमाया ही मालिका कोणत्या तारखेला रिलीज होणार याची अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आली नाही. तसेच या सस्पेन्सने भरलेल्या मालिकेत कोणते कलाकार झळकणार आहेत हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. बीग बॉस मराठीचा विजेता अक्षय केळकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो प्रोफेसर आरुष वालावलकर हे पात्र साकारणार आहे, जो एक साधा, सरळ आणि कुटुंबावर प्रेम करणारा कवी मनाचा प्राध्यापक आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच सुरू होणारी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल, अशी अपेक्षा आहे.






