Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद केळकरच्या ‘रानटी’मध्ये दिसणार ॲक्शन ड्रामा, चित्रपटाचा दमदार टिझर झाला रिलीज!

अभिनेता शरद केळकर ‘रानटी’नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु असून, या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 06, 2024 | 12:32 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या भव्य ॲक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून ॲक्शन, ड्रामा आणि इमोशन्स यांची जबरदस्त गुंफण पहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. अभिनेता शरद केळकर यांच्यासह अनेक कलाकारांचा जबरदस्त ‘रानटी’ अंदाज या चित्रपटामध्ये दिसत आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शनपट असणार आहे. आपल्या खलनायकी अवताराने सर्वांचा थरकाप उडवणारे बॉलीवूडचे सुप्रसिद्ध ‘रानटी’ खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा दिग्दर्शिक समित कक्कड च्या ‘रानटी’ चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.

‘अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट’ अशा दमदार डायलॉगने अवतरलेला ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. ॲक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा कथेतला ड्रामा असं एक ‘सुपर पॅकेज’ असलेला पॉवरफुल ॲक्शनपट ‘रानटी’ येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची आतुरता लागली आहे. या चित्रपटामध्ये दमदार कलाकार त्याच्या धमाकेदार भूमिकेत काम करताना दिसणार आहेत.

हे देखील वाचा – राशी खन्नाने आगामी चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ बाबत केला खास खुलासा, म्हणाली…

 

लेखनापासून ते अभिनयापर्यंत आणि निर्मितीमूल्यांपासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर दिग्दर्शक समित कक्कड यांचे सर्व चित्रपट लक्षवेधी राहिले आहेत. ‘रानटी’ च्या निमित्ताने मराठीत भव्य ॲक्शनपट घेऊन आले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून त्यातील वेगळेपणा आणि भव्यता दिसून आली आहे. ‘रानटी’चा टिझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशः काटे येतात. हा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हे देखील वाचा – संगीत निर्माता अंशुल गर्गचे स्वप्नं पूर्ण, तब्बल 30 कोटी मोजून घेतलं नवं ऑफिस!

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम चित्रपटाला लाभलेली आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चाहते हा चित्रपट रिलीज होण्याआधिच या चित्रपटाच्या टिझरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Sharad kelkar raanti the action drama the powerful teaser of the film has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 03:24 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!
1

‘घरत गणपती’ चित्रपटगृहात पुन्हा झळकणार, गणेशोत्सवात धमक्यात साजरा होणार!

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप
2

Govinda- Sunita Ahuja: सुनीता आहुजाची घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल, गोविंदावर केले गंभीर आरोप

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील
3

‘बिग बॉस’ फेम सबा खान केले गुपचूप लग्न, कुटुंब आणि जवळचे मित्र सेलिब्रेशनमध्ये झाले सामील

लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अर्धनग्न अवस्थेत फिरला रॅपर Lil Nas X, पोलिसांनी केली अटक
4

लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर अर्धनग्न अवस्थेत फिरला रॅपर Lil Nas X, पोलिसांनी केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.