Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच दिवशी सात मराठी चित्रपट प्रदर्शित ! हीच स्पर्धा टाळण्यासाठी ‘या’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘शातिर’ डाव खेळला

येत्या 23 मे 2025 रोजी एक-दोन नव्हे तर तब्बल 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हीच स्पर्धा टाळण्यासाठी 'शातिर द बिगिनिंग' या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 21, 2025 | 09:36 PM
'शातिर द बिगिनिंग' 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

'शातिर द बिगिनिंग' 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट निर्माण होतात, म्हणजे प्रत्येक आठवड्याला किमान दोन मराठी चित्रपट येणार हे निश्चित असते. परंतु, मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यावर कोणत्याही संस्थेचे, चित्रपट महामंडळाचे नियंत्रण नसल्याने अनेकदा तीन – चार मराठी चित्रपट एकाच आठवड्यात येतात. यामुळे कोणत्याच चित्रपटाला प्राइम टाइम मिळत नाही, 23 मे रोजी तर तब्बल सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होते. ही मराठी चित्रपटांची अनियंत्रित स्पर्धा टाळण्यासाठी ‘शातिर द बिगिनिंग’ च्या निर्मात्यानी एक पाऊल पुढे टाकत त्यांचा चित्रपट 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टिझरला मिळली होती पसंती

‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातिर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लाँच झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे.  चित्रपटाच्या पोरी आम्ही मराठी पोरी…. या गाण्याप्रमाणेच टिझर आणि ट्रेलरला मराठी पेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे.

‘राजा शिवाजी’च्या रूपात चमकला रितेश देशमुख, फर्स्ट लुकने वेधले लक्ष; चित्रपट कधी होणार रिलीज!

सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित शातिर द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

तर मग 23 मे रोजी चित्रपट झाला असता रिलीज

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातिर The Beginning हा माझा दिग्दर्शक म्हणून पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 23 मे रोजी आम्ही चित्रपट रिलीज करणार होतो मात्र ऐनवेळी काही निर्मात्यांनी याच दिवशी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाच्या निर्मात्या, अभिनेत्री रेश्मा वायकर म्हणाल्या, चित्रपटाची गाणी, ट्रेलर याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शनासाठीची आमची संपूर्ण तयारी झालेली आहे, परंतु एकाच वेळी सात मराठी चित्रपट नको म्हणून आम्ही आमचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट महामंडळाने एखादी समिती तयार करून एका वेळी दोन किंवा तीन पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण एका वेळी ५-७ मराठी चित्रपट आले तर कुणालाही प्रेक्षक मिळणार नाही आणि परिणामी याची झळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला बसेल.

‘विकृत म्हातारा…’, कियाराच्या बिकिनी सीनवर अश्लील कमेंट, राम गोपाल वर्मावर संतापले नेटकरी!

शातिर The Beginning या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे.

सत्य घटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणार, सस्पेन्स थ्रीलर असलेला  शातिर The Beginning हा मराठी चित्रपट येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shatir the beginning producers postponed film release date to avoid clashes with 7 marathi movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 09:36 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘इतके दिवस गप्प राहिलो, ६,७०,१५१ चं पेमेंट अडकवलं…,’ मंदार देवस्थळींसाठी मालिकेच्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
2

‘इतके दिवस गप्प राहिलो, ६,७०,१५१ चं पेमेंट अडकवलं…,’ मंदार देवस्थळींसाठी मालिकेच्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
3

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
4

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.