
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. 11 जानेवारी रोजी बिग बॉस मराठी सीझन ६चा ग्रँड प्रीमियक पार पडला. या सहाव्या पर्वात इंडस्ट्रीतील कलाकार ते सोशल मिडिया इन्सफ्लुएन्सर अशा विविध क्षेत्रांतील स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. या आठवड्यात या शोमध्ये वाद, मैत्री, काही भावनिक क्षण, तसेच टास्क जिंकण्यासाठीची चढाओढ पाहायला मिळाली. बिग बॉस मराठीमध्ये नुकतच मकर संक्रांतिनिमित्त टास्क पार पडला. रितेश देशमुख यांच्या ‘भाऊचा धक्का’ येण्यापूर्वीच घरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून, पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ९ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. प्रभू शेळके, दीपाली सय्यद, कारण सोनावणे, दिव्या शिंदे, सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील, रुचिता जामदार यांच्यामध्ये कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसने कॅप्टन्सीसाठी नॉमिनेट झालेल्या तन्वी कोलते, प्राजक्ता शुक्रे व सोनाली राऊत या तीन स्पर्धकांना घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याचा टास्क दिला होता. तन्वी कुलतेने सागर कारंडे व दिव्या शिंदे यांना नॉमिनेट केलं. तर, प्राजक्ता शुक्रेने अनुश्री माने व प्रभू शेळके यांना नॉमिनेट केलं. तर, सोनाली राउतने राधा मुंबईकर आणि रोशन भजनकरला नॉमिनेट केलं.त्यामुळे घराबाहेर जाण्यासाठी रोशन थेट नॉमिनेट झाला आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
शिव ठाकरेचा रोशन भजनकरला पाठिंबा
पण, अशातच आता त्याला बिग बॉस मराठी सीझन २ चा विजेता शिव ठाकरे यानें त्याला पाठिंबा दिला आहे. शिवने इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रोशनला टॅग करत “भाऊ आहे आपला” असं देखील म्हटलं आहे.रोशनसह बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकही नॉमिनेट झाले आहेत.नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील ९ सदस्यांवर इविक्शनची टांगती तलवार आली आहे. या प्रक्रियेत स्पर्धकांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत एकमेकांना नॉमिनेट केले. नॉमिनेटेड सदस्य यांमध्ये कोण टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे लवकरच समजणार आहे. तसेच आता या ‘बिग बॉस मराठी ६’ सीझन काय धमाका करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.