(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
2015 साली चित्रपट विश्वात एका सिनेमानं प्रेक्षकांची मन तर जिंकली पण बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ही पाटी देखील लावली आणि हा चित्रपट म्हणजे “मितवा”. निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मितवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि तेवढंच प्रेम प्रेक्षक आजही स्वप्नीलला देत आहेत आणि कदाचित ही अभिनेत्याच्या उत्तम कामाची पोचपावती आहे. असे म्हणायला हरकत नाही.
स्वप्नीलने त्याचा चित्रपट कारकिर्दीत अनेक विषयांवर आधारित चित्रपट करून नवनवीन भूमिका साकारल्या ज्यातल्या अनेक भूमिका या तितक्याच खास आणि रोमँटिक होत्या. मितवा मधली स्वप्नीलच्या भूमिकेन केवळ प्रेक्षकांची मन जिंकली नाही तर तरुण वर्गाला वेड लावलं. ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ अशा चित्रपटांमधून तयार झालेली स्वप्नीलची लव्हरबॉयची इमेज स्वप्नीलने ‘मितवा’मध्ये अजून उत्तमपणे साकारली. त्याचा वाट्याला आलेले इमोशनल आणि रोमँटिक सिन्स त्याने विलक्षण तन्मयतेने केले आणि म्हणून स्पप्नीलला पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी उसळली. स्वप्नीलच्या अभिनयाच्या चाहत्यांसाठी ‘मितवा’ ही पर्वणी ठरली यात शंका नाही.
Prabhakar Karekar: लोकप्रिय गायक प्रभाकर कारेकर यांचे निधन, वयाच्या ८० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप!
मितवा बद्दलच्या आठवणीना उजाळा देताना स्वप्नील म्हणाला की, “मितवा आमच्या आयुष्यातला खूप महत्वपूर्ण सिनेमा आहे त्याला अनेक कारणं आहेत चित्रपटाची कथा, टायटल यामुळे या चित्रपटातलं वेगळेपण लक्षात राहत. शंकर एहसान लॉय याचं संगीत असलेली गाणी माझ्यावर चित्रित झाली ही खूप भाग्याची गोष्ट या चित्रपटामुळे माझ्यासोबत घडली. सोनली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे सारख्या अत्यंत गुणी कलाकार मैत्रीणी या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यासोबत जोडल्या गेल्या.’ असे तो म्हणाला.
पुढे अभिनेता म्हणाला की, ‘मितवा ही मराठी सिनेमा विश्वातील आगळी वेगळी लवस्टोरी होती आणि मितवा होण्यापूर्वी अनेक लवट्रँगल आणि लवस्टोरी झाल्या पण ते इतके चालले नाही पण हार्डकोर लवस्टोरी असलेला मितवा हा चित्रपटगृहात खूप उत्तम चालला आणि याचा आनंद तर होता पण मराठी चित्रपटसृष्टीत हेलिकॉप्टर मधून उतरणारा अभिनेता दाखवणं असो किंवा दमदार लवसाँग करणं असो हे सगळं मितवा मुळे शक्य झालं. ज्या गोष्टी साठी आपण बॉलिवुड चित्रपट बघायचो त्याला तोडीस तोड देणारा मितवा मराठी मध्ये घडला याचा खूप आनंद आहे. शिवम सारंग हे पात्र आजही माझ्या तितकच खास आहे. मितवा चित्रपटाची संपूर्ण टीम ही अनेक गोष्टीमुळे माझ्याशी जोडली गेली आणि आजही मला रोज फॅन भेटतो तो नक्की चित्रपटाच्या शेवटा बद्दल तोंड भरून कौतुक करतो आणि सांगतो की सर असा शेवट मराठी सिनेमात आजवर पाहिला नाही तर हेच प्रेक्षकांचं प्रेम मला मितवा ने दिलं आणि मी कायम या बद्दल ऋणी राहील”. असे अभिनेता म्हणाला आहे.
आज या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झालं आहे. १० वर्षांनी सुद्धा मितवा चित्रपटाची तीच जादू बघायला मिळते. मितवा जरी १० वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही हा चित्रपट तितकाच एव्हरग्रीन आहे.