
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व सुरू होताच घरात रोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहे.कधी कधी वाद, मैत्री, टास्क जिंकण्यासाठी चढाओढ करताना प्रेक्षक दिसत आहेत. विशेषतः तन्वी कोलते सध्या घरामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.या प्रोमोत दिसत आहेत की घरात दोन मोठे राडे पाहायला मिळतील. प्रोमोमध्ये दिसत आहे दीपाली सय्यद आणि तन्वीमध्ये चांगलीच जुंपली आहे. तर दुसरीकडे सागर कांरडे आणि तन्वीमध्ये ही राडा झाला आहे.
दीपाली सय्यद आणि तन्वीमध्ये जुंपली
घरात कामाच्या वाटणीवरून आणि ड्युटीवरून तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद यांच्यात तीव्र वाद झाले. कामाच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये खटके उडालेले पाहायला मिळाली. या दोन्ही वादामुळे घरातील इतर सदस्यही थोडे अवाक झाले आहेत.दीपाली सय्यद आणि तन्वी कोलते यांच्यातील शाब्दिक चकमक होताना बघायला मिळणार आहे. दीपाली सय्यद म्हणाली की, ” मी जिथे चांगली असते ना तिथे चांगली असते आणि जिथे तुमचं मतं आहे ना ते मांडा आणि तिथे तुम्ही ठाम राहा. तन्वी कोलते त्यावर म्हणाली, “नाही! नाही! हे कॅमेऱ्याला दिसेल… तू फक्त एवढंच बोललीस, ही पण तशीच वागत असेल तर सांग… ती त्याच्याकडे बघून बोलली नव्हती. अरे यार! कसं चालू करतात यार… कशाला? मला माहीत नव्हतं की एवढा तमाशा करतील एवढ्याशा गोष्टीवर… सॉरी,”
”आज मकर संक्रांत आहे म्हणून मी सगळ्यांशी गोड बोलले, मला काय माहीत होतं हे असं वाकड्यात जातील.ज्यांना वाकड्यात जायचं आहे त्यांनी वाकड्यातच जावं … दीपाली सय्यद त्यावर बोलताना म्हणाली “तुम्हाला प्रूफ करायचंय! मला काही प्रूफ नाही करायचंय मी काय आहे आणि काय नाहीये ते. तिचे म्हणणे आहे मी मान देते, मी मोठ्यांना मान देते. तुला आदर घेता येत नाही… तू मोठी आहेस तुला हे कळत नाही का? अरे मोठ्यांना वाईट वाटत नाही का? तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको तेव्हा कुजबुज करायची हे काय आहे?” तन्वी कोलते रोशनची बोलताना म्हणाली “असं करून जर मी वाईट होणार असेल, तर मी वाईटच बरी आहे बाबा!”
‘बिग बॉस’च्या घरात आता नवीन ग्रुप्स आणि समीकरणं तयार होताना दिसत आहेत. आता नेमकं कोणते स्पर्धेक कोणती टीम करणार हे पाहणं महत्त्वाचे असेल