Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्ट “एक डाव भुताचा” चित्रपटाचे टीजर झाले लाँच!

स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची धमाल गोष्ट "एक डाव भुताचा" या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणारा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. 

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 13, 2024 | 03:34 PM
(फोटो सौजन्य-YouTube)

(फोटो सौजन्य-YouTube)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपट ‘एक डाव भूताचा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, या चित्रपटामधील पहिले गाणे देखील रिलीज झाले आहे. तसेच या चित्रपटाचा नुकताच टीजर लाँच करण्यात आला आहे. ‘एक डाव भूताचा’ हा चित्रपट अस्सल मनोरंजन आणि कॉमेडीसह प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अनके मराठी कलाकार कॉमेडीचा तडका देणार आहेत. हा चित्रपटात पाहताना प्रेक्षक लोटपोट हसणार आहेत.

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भूताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्या सोबत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे या सगळ्या मराठी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तसेच या चित्रपटाचे डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन केले आहे. तर, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन केले आहे. गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन आणि प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि मराठी मधील सुप्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

हे देखील वाचा- रणवीर सिंग, विकी कौशल, आयुष्मान खुराना? नर्गिस फाखरीने सांगितले कोणत्या अभिनेत्यासह करायचे आहे काम!

स्मशानात जन्म झाल्याने सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवने निभावली आहे, तर मकरंद अनासपूरे भूताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा आहे. त्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. हा चित्रपट ४ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The colorful story of the relationship between man and ghost ek dav bhutacha movie teaser launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 03:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.