(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न उत्तमोत्तम चित्रपटांच्या तुलनेत धडाकेबाज ॲक्शनपट कमीच होतात. आता ही उणीव ‘गौरीशंकर’ हा मराठी चित्रपट भरून काढणार आहे. या चित्रपटाचा धडाकेबाज टीजर लाँच करण्यात आला असून, २८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील सगळे नवीन कलाकार तुम्हाला चित्रपटाद्वारे नवा अनुभव देणार आहेत. तसेच या चित्रपटात नवी प्रेम कथा देखील पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटाचा नुकताच टीझर लाँच करण्यात आला. ज्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या गौरीशंकर या चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी केली आहे. ऑरेंज प्रॉडक्शन्स चित्रपटाचे सहनिर्माता आहेत. हरेकृष्ण गौडा यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. चित्रपटात हरेकृष्ण गौडा, कविता वसानी दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रशांत आणि निशांत यांनी संगीत दिग्दर्शन, रोशन खडगी यांनी छायांकन, संकेत कोळंबकर यांनी गीतलेखन, अमित जावळकर यांनी संकलन, राशिद मेहता यांनी ॲक्शन, अमित चिंचघरकर यांनी कला दिग्दर्शन, मेकअप नितिन दांडेकर, धनश्री साळेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी निभावली असून कार्यकारी निर्माता म्हणून सिद्धेश आयरे यांनी काम पाहिले आहे.
२५ दिवसांनंतर, सैफ अली खानने सोडले मौन; हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला – “त्या बिचाऱ्या…”
‘प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही – तोच आहे ‘गौरीशंकर” अशी गौरीशंकर या चित्रपटाची टॅगलाईन आहे. नुकत्याच लाँच केलेल्या टीझरमध्ये हाणामारी करणारा, ‘टेन्शन लेने का नाहीं देने का’ असं म्हणणारा रांगडा तरूण दिसतो आहे. मात्र हा तरूण असा का आहे, त्याची काय गोष्ट आहे याची उत्सुकता या टीझरने निर्माण केली आहे. त्याबरोबरच ॲक्शनपॅक्ड मनोरंजनाची हमी हा टीझर देतो आहे.
विक्रांत मेस्सीच्या मुलाला झाले १ वर्ष पूर्ण; अभिनेत्याने अखेर चाहत्यांना दाखवला वरदानचा चेहरा!
‘गौरीशंकर’ या चित्रपटातली कथा आहे गौरी आणि शंकर यांच्या प्रेमाची… दुर्दैवानं त्यांच्या प्रेमात एक संकट निर्माण होते. त्याच्यावर आलेल्या संकटाचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न या आशयसूत्रावर ‘गौरीशंकर’ हा चित्रपट बेतला आहे. नव्या दमाचे कलाकार हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एक थरारक, रोमांचक मनोरंजक कथानक मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ‘गौरीशंकर’ प्रदर्शित होण्याची रसिकप्रेक्षकांना अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे. आता या चित्रपटाची कथा आणि पात्र मोठया पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात दाखल होणार आहे.