
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘आफ्टर ओएलसी’ या चित्रपटाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशातच आता या चित्रपटातील पहिलं वहिलं रोमँटिक सॉंग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘लय लय लय’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणं सध्या प्रत्येक प्रेमीयुगीलाच्या दिलावर राज्य करताना दिसत आहे. चित्रपटातील हे ‘लय लय लय’ गाणं साऊथ सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते कवीश शेट्टी आणि अभिनेत्री मेघा शेट्टी यांच्यावर चित्रित झाल आहे. चित्रपटातील ‘लय लय लय’ हे रोमांटिक गाणं आपली मराठमोळी गायिका वैशाली सामंत हिने तिच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. वैशालीने आजवर अनेक गाण्यांना आवाज दिला आहे आणि तिचं प्रत्येक गाणं व्हायरल झाल आहे. आता वैशालीच्या आवाजातील ‘लय लय लय’ हे गाणंही ट्रेंडिंगवर आहे.गाण्याच्या संगीताची जबाबदारी प्रांशू झा यांनी सांभाळली आहे. तर गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहेत
. संस्कृतीच्या ‘संभवामी युगे युगे’साठी सुमित राघवन देणार कृष्णाचा आवाज, म्हणाले ‘मी म्हणालो कारण…’
हा चित्रपट ॲक्शन पॅक्ड असला तरी चित्रपटातील या गाण्यातील रोमँटिक बाजूही प्रेक्षकांसमोर आली आहे. आणि त्यामुळेच चित्रपटाबाबत आणखीनच उत्सुकता साऱ्यांच्या मनात लागून राहिली आहे. कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदाकारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केलाय. या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दीपक राणे फिल्म’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. येत्या 28 नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटातील हे रोमँटिक सॉंग v Naad Music या युट्यूब चॅनेलवर धुमाकूळ घालत आहे.