(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
गायक अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांच्या आवाजतलं “वाजणार गं गाजणार गं….” हे गाणं “एक डाव भूताचा” या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातलं हे गाणं सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख थिरकताना चाहत्यांना दिसणार आहे. हे गाणं एकदम अनोख्या पद्धतीत चित्रित करण्यात आले आहे.
रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. तसेच डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन केले आहे. याचदरम्यान गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन आणि प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. या चित्रपटाला असे दिग्गज कलाकार प्राप्त झाले असून, हा चित्रपट नक्कीच चित्रपगृहात धुमाकूळ करेल यात शंकाच नाही.
हे देखील वाचा- प्रभू देवा आणि सनी लिओनीचा ‘पेट्टा रॅप’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, निर्मात्यांनी शेअर केले पोस्टर!
तसेच, ‘एक डाव भूताचा’ या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे यांच्या अभिनयाची चाहत्यांना जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधवबरोबर मयुरी देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अवधूत गुप्ते, आनंदी जोशी यांनी या पूर्वी अनेक हिट गाणी दिली आहेत. आता उत्तम शब्द, संगीत असलेल्या “वाजणार गं गाजणार गं…” या गाण्याची त्यात भर पडणार आहे. या चित्रपटासह या चित्रपटातील गाणी देखील हिट होतील अशी आशा आहे. ‘एक डाव भूताचा’ हा चित्रपट ४ ऑक्टोबरला चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे.