फोटो सौजन्य - कलर्स मराठी
बिग बॉस मराठी : मराठी बिग बॉस सिझन पाच सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सीझनचा अंतिम टप्पा सध्या सुरु आहे, त्यामुळे दिवसेंदिवस बिग बॉस स्पर्धकांसाठी मनोरंजक टास्क आणत आहे. आता बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने नवा एक बिग बॉसचा आवडता टास्क आणला आहे तो म्हणजेच फ्रीझ आणि रिलीज. यामध्ये प्रत्येक सिझनला स्पर्धकांसाठी हा टास्क असतो या खेळामध्ये जेव्हा बिग बॉस फ्रीझ सांगितली तेव्हा सर्व स्पर्धक जिथे असतील तिथे उभे राहतील आणि हालचाल न करता स्टॅचूच्या पोझमध्ये उभे राहतील. यावेळी बिग बॉस घरातील स्पर्धकाच्या घरच्यांना घरामध्ये पाठवतात. आता असाच टास्क बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हा टास्कचे आयोजन करण्यात आले आहे.
इंडियन इंडोल सीझन एकचा विजेता अभिजीत सावंत त्याच्या चतुराईने चाहत्यांची मनं जिंकत आहे. आता फ्रीझ आणि रिलीज या टास्कमध्ये अभिजितची पत्नी घरामध्ये आली होती. यावेळी तिला त्याने पाहताच तो भावुक झाला आणि त्याला मिठी मारली. त्यानंतर त्याच्या दोन्ही मुली घरामध्ये आल्या आणि त्याचे अश्रू अनावर झाले. त्याचा हा भाविक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धनंजय पॉवरने नेहमीच्या त्याच्या बाबांबद्दल त्याने जनतेला सांगितले आहे की, बाबांनी त्याच कौतुक केलं नाही. यावेळी बिग बॉसने त्यांना घरातल्या स्पर्धकांना फ्रीझ केलं आणि यावेळी धनंजयचे बाबा घरात आले आणि त्याचे अश्रू अनावर झाले.
बिग बॉस मराठी सिझन ५ चा फिनाले हा ६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, यामध्ये आतापर्यत आठ स्पर्धक अजूनही घरामध्ये शिल्लक आहेत.