Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ चित्रपटामधील दमदार म्युझिक लाँच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पँथरच्या गाण्यांचा गजर होणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच 'जयभीम पँथर – एक संघर्ष' चित्रपट येणार असून, या चित्रपटामधील दमदार म्युझिक लाँच झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2025 | 02:56 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला यंदा नव्या गाण्यांचा गजर होणार आहे. ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या चित्रपटाचं म्युझिक लाँच नुकतेच करण्यात आले आहे. याप्रसंगी निर्माते भदंत शीलबोधी थेरो, भिक्खू संघ, मा भीमराव आंबेडकर साहेब, सिद्धार्थ कासारे, मा. सागर संसारे, मिलिंद शिवशरण, संजय भाऊ खंडागळे चित्रपटातील कलाकार आणि प्रोजेक्ट हेड संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील, कलादिग्दर्शक प्रकाश सिंगारे आवर्जून उपस्थित होते. अत्यंत संवेदनशील आणि दमदार गाणी या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहेत.

प्रियांका चोप्राच्या पतीने आधी सासूला, मग पत्नीला केलं इम्प्रेस; प्रत्येक जावयाने घेतले पाहिजे निक जोनसचे ‘हे’ गुण

भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला “जयभीम पँथर” एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील आणि कलादिग्दर्शक म्हणून प्रकाश सिंगारे यांनी काम पाहिले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी केले आहे. चित्रपटात २ गीते आहेत ज्याचे लेखन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. ‘माझ्या भीमाची जयंती’ हे गीत सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. तर ‘जयभीम घोष होऊ दे’ हे गाण अजय देहाडे, शुभम म्हस्के यांचा सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी वेगवेगळी गाणी तयार केली जातात. आता ‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ या चित्रपटाची ही दोन नवी गाणी लोकांच्या भेटीस येणार आहे.

सई ताम्हणकर देणार चाहत्यांना सुखद धक्का, पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर! ‘देवमाणूस’मध्ये दिसणार झलक

‘जयभीम पँथर – एक संघर्ष’ मध्ये गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे आणि प्रियांका उबाळे यांसारखे अनुभवी आणि लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिका आहेत. बहुजन समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणेचा संघर्ष हा या चित्रपटाचा आशय आहे. समाजातील अन्याय अत्याचाराविरुद्ध उभ्या राहणाऱ्या अनेक संघटनांसोबत काय होते, यांची रंजक गोष्ट या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या ११ एप्रिल प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना सर्व सिनेमागृहात हा चित्रपट पाहता येणार आहे.

Web Title: The song mazya bhimachi jayanti from the movie jai bhim panther ek sangharsh is launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi film

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
2

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
3

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
4

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.