
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रिया बापट आणि उमेश कामत या रिअल लाईफ कपलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली आहे आणि या चित्रपटातही त्यांच्या नात्यातील गोड तिखट प्रसंगांनी प्रेक्षकांना भावनिक केले आहे. या चित्रपटाला ॲमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांच्या सोबत चित्रपटात गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या देखील दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सगळ्यांचे काम चाहत्यांना खूप आवडले आहे.
चित्रपटाबद्दल आणि ॲमेझॉन प्राईमच्या ट्रेंडिंगवर बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, “ ‘बिन लग्नाची गोष्ट’ आपल्या आजूबाजूच्या नात्यांचे प्रतिबिंब आहे. नात्यातील मतभेद, एकमेकांवरील विश्वास आणि एकत्र प्रवास हे या चित्रपटात आम्ही दाखवले आहे. अॅमेझॉन प्राईमवर चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.”
सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री देऊन करण्यात येणार सन्मानित ? FWICE चे पंतप्रधान मोदींना आवाहन
तसेच चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य म्हणाले, “हा चित्रपट नात्यांच्या बदलत्या स्वरूपावर विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आहे. आजच्या पिढीचे आयुष्य, त्यांची नात्यांकडे पाहाण्याची दृष्टी, त्यातील गोडवा आणि संघर्ष हे या चित्रपटात मांडले गेले आहे. चित्रपटगृहानंतर ओटीटीवर मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आमच्यासाठी बक्षीस आहे.” असे ते म्हणाले.
गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांनी लिहिली आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित हा चित्रपट प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक, सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजला आहे.