Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Drushya-Adrushya’ मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण! ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Drushya-Adrushya हा आगामी मराठी सस्पेन्स थ्रिलर सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. १९ जून रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरमुळे उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 05, 2026 | 04:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • १९ जून रोजी तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
  • पुन्हा एकदा हा सिनेमा चर्चेत आला
  • दिग्दर्शनाची धुरा Milind Lele यांनी सांभाळली आहे
काही चित्रपट त्यांच्या दमदार कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशाच वैशिष्ट्यांमुळे Drushya-Adrushya हा आगामी मराठी सिनेमा सध्या चर्चेत आहे. उत्कंठावर्धक शीर्षकामुळे आधीच उत्सुकता वाढलेली असताना या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून १९ जून रोजी तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Raja Shivaji Box Office Collection : 4 दिवसांत फतेह केला चौथा क्रमांक! Highest Grossing च्या यादीत हे सिनेमे सोडले मागे

५६व्या International Film Festival of India (IFFI) मध्ये या चित्रपटाने जागतिक स्तरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे ‘दृश्य-अदृश्य’ची चर्चा चहूबाजूंनी रंगली असून पोस्टर रिलीजमुळे पुन्हा एकदा हा सिनेमा चर्चेत आला आहे. RST Canvas निर्मित या सस्पेन्स थ्रिलरची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा Milind Lele यांनी सांभाळली आहे.

या चित्रपटात Pooja Sawant मुख्य भूमिकेत असून तिचा पोस्टरवरील भावपूर्ण आणि रहस्यमय लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. तिच्यासोबत Ashok Samarth, Suvrat Joshi, Hardik Joshi, Akshaya Gurav, Vidyadhar Joshi आणि Keya Ingle हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

पोस्टरमधून वास्तव आणि भ्रम यांच्यातील सूक्ष्म सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ यामधील गुंतागुंत, तसेच सत्य आणि भास यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात येणार असल्याचे संकेत मिळतात. डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी आणि खरे वास्तव यामधील संभ्रम प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणार आहे.

Raja Shivaji : अबबब… गुंतवले इतके, 4 दिवसात काढले इतके; निर्मात्यांसाठी पैसा वसूल! जाणून घ्या आतापर्यंतचे Returns

या चित्रपटाचे संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. वलय मुळगुंद यांच्या गीतांना Ashish Mujumdar आणि Devdatta Baji यांनी संगीत दिले आहे. Priyanka Barve आणि Nidhi Hegde यांनी गाणी सादर केली आहेत. नृत्य दिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले असून, रंगभूषा महेश बराटे, वेशभूषा किर्ती जंगम-जोशी, छायाचित्रण अमोल साळुंके, संकलन सचिन वाघ आणि कला दिग्दर्शन नितिन बोरकर यांनी केले आहे. एकूणच, दमदार कलाकार, वेधक कथा आणि रहस्यमय मांडणीमुळे Drushya-Adrushya हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.

Web Title: Unveiling of the poster for the marathi film drushya adrushya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Pooja Sawant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.