(फोटो सौजन्य - Instagram)
झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित , शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय.’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाला चाहत्यांचा सिनेमागृहात चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट पाहून आपल्याला समजेल की या सिनेमात उत्कृष्ट मराठी कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळाली आहे. सगळ्या मराठी कलाकारांची कामं यामध्ये नावाजण्यासारखी आहेत. ‘आता थांबायचं नाय’, ह्या ५ धमाकेदार कारणांमुळे तो नक्की पाहायला. आता ही कारणं काय आहे जाणून घेऊयात.
१. भरत जाधवची अनोखी भूमिका
हास्याचा राजा आणि रंगमंचाचा बादशहा, भरत जाधव या चित्रपटामध्ये एका सध्या आणि काळजाला भिडणाऱ्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्याची अशी भूमिका कधी प्रेक्षकांना पाहायला मिळाली नसेल. टूटलेल्या व्यवस्थेशी झुंजणारा, सामान्य माणसाची कहाणी सांगणारा अशी अभिनेत्याची भूमिका संपूर्ण चित्रपटामध्ये दिसत आहे.
चित्रपट निर्माते Dheeraj Kumar यांचे निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
२. सिद्धार्थ जाधवचं हसवणं आणि हादरवून टाकणं दोन्हीचा बाप परफॉर्मन्स
कॉमेडीचा बादशहा असलेला सिद्धार्थने चित्रपटामध्ये नवी भूमिका साकारून चाहत्यांना चकित केले. अभिनेत्याचा इमोशनल इंटेन्सिटीचा नवा अवतार या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला आहे. त्याचा अभिनय हलक्याफुलक्या पंचेससह, कथेला एक भावनिक बळ आणि ताकद देते. जी प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. अभिनेत्याचा अभिनय यामध्ये खूप जबरदस्त आहे.
३. आशुतोष गोवारीकर – पुन्हा अभिनयाच्या रंगमंचावर!
‘लगान’ आणि ‘स्वदेस’ सारख्या क्लासिक सिनेमांचे दिग्दर्शक केलेले दिग्दर्शक आणि अभिनेता आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटामध्ये काम करून लक्ष वेधले आहे. त्यांचे चित्रपटामधील सादरीकरण शांत, खोल आणि ठसठशीत दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांना त्यांचा अभिनय खूप आवडला आहे. तसेच अनेक वर्षानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर काम करताना पाहून चाहते खुश झाले.
४. फक्त स्टारपावर नाही, तर वास्तवाशी नातं सांगणारी गोष्ट!
‘आता थांबायचं नाय’ फक्त एक सिनेमा नाही तर ती एक व्यवस्थेतील अन्याय, संघर्ष आणि आत्मसन्मान मिळवण्यासाठीची झुंज दाखवणारी कथा आहे. कोणतीही सिस्टम जेव्हा तुमचं अस्तित्व झटकून टाकते, तेव्हा हिम्मत कशी जमवायची, आणि आयुष्याला कसं सामोरे जायचे हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहेत.
अरिशफा खानची बिघडली प्रकृती, ‘Bigg Boss’ च्या घरात जाण्याआधीच रुग्णालयात दाखल
५. मनाला भिडणारी कथा – जी मनात घर करून बसते!
या चित्रपटाच्या केंद्रस्थानी तुकाराम (भरत जाधव) हा सफाई कर्मचारी दाखवण्यात आला आहे. ज्याने स्वतःच संपूर्ण आयुष्य मुंबईचे रस्ते साफ करण्यामध्ये घालवलं आहे. यानंतर तिथे नव्याने रुजू झालेले कर्मचारी (आशुतोष गोवारीकर) हे त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देतात. या नंतर तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रवास या संपूर्ण चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.