अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रसिद्ध सिने निर्मात्याचा मृत्यू, DNA टेस्टनंतर पटली ओळख
गुजराती चित्रपट निर्माता महेश जिरावाला यांचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत निधन झाले आहे. १२ जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत सिनेनिर्माता बेपत्ता होता. डीएनए टेस्टच्या माध्यमातून निर्मात्याची ओळख आता पटली आहे. निर्माता महेश जिरावाला ह्याची पत्नी हेलत हिने विमान अपघातात रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महेशचाही समावेश असू शकतो, असा तिने दावा केला होता. अखेर, अहमदाबाद विमान दुर्घटनेत महेश याच्या निधनाची बातमी अखेर खरी ठरली आहे.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून आमिर खानचं जबरदस्त कमबॅक, पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा आला समोर
महेश एअर इंडियाच्या विमानातही नव्हता किंवा ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं होतं, त्यातही नव्हता. विमान अपघात झाला त्या दिवसापासून महेश बेपत्ता आहे. तब्बल ९ दिवसांनंतर आता सिनेनिर्मात्याचा डीएनए अहवालात त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. डीएनए अहवाल समोर आल्यानंतर महेशच्या कुटुंबीयांकडे त्यांचा मृतदेह सोपावण्यात आला आहे. गुजराती माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महेश जिरावाला एअर इंडियाचे विमान ज्या परिसरात कोसळले ते त्याच ठिकाणी होते. अपघातस्थळावरून त्यांची जळालेल्या अवस्थेत स्कूटर सापडली होती.
बॉलिवूडची ‘कूल आई’! रीमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती! जाणून घ्या अभिनेत्रीविषयी…
शिवाय पोलिसांसह महेश यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले होते. त्यावेळी महेश यांचे शेवटचे अपघातस्थळच दाखवलं जात होतं. दरम्यान, महेश यांचे कुटुंबीय त्यांचे निधन झाले, हे स्वीकारायला तयार नव्हते. त्यांना महेश यांच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी त्यांच्या स्कूटरचा चेसिस नंबर व डीएनए रिपोर्ट कुटुंबियांना दाखवले, त्यानंतर त्यांनी मृतदेह घेतला. महेश यांच्या पश्चात पत्नी हेतल आणि दोन मुलं आहेत. महेश जिरावाला हे अहमदाबाद शहरातील नरोडा येथील रहिवासी आहेत. महेश एड्स तसेच म्युझिक व्हिडिओंचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जातात. ते महेश जिरावाला प्रॉडक्शन्स या प्रॉडक्शन हाऊसचे सीईओ आहेत. त्यांचे अनेक म्युझिक व्हिडिओ आहेत, जे प्रामुख्याने गुजराती भाषेत आहेत. त्यांनी २०१९ मध्ये ‘कॉकटेल लव्हर पग ऑफ रिव्हेंज’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये आशा पांचाळ आणि वृती ठक्कर मुख्य भूमिकेत होते.