Reema Lagoo Birthday Sridevi Cut Down Her Role In Gumrah Because Of Shocking Reason
रुपेरी पडद्यावरची ग्लॅमरस आई म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचा आज २१ जून वाढदिवस आहे. रिमा लागू आज जरीही आपल्यात नसल्या तरीही त्या त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून जिवंत आहे. ७० ते ८० चा काळ रिमा लागू यांनी गाजवला होता. त्यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली. रिमा लागू यांचं खरं नाव, ते नाव नसून वेगळं आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरी मृत्यू, दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना कळाला मृतदेह; काय आहे गूढ ?
हिंदी चित्रपटसृष्टीतील दुःखी आणि अश्रू गाळणाऱ्या आईची प्रतिमा रीमा लागू यांनी आपल्या हसतमुख आधुनिक आईच्या भूमिकांनी मोडीत काढली होती. रीमा लागू यांचे खरे नाव नयन भडभडे असे होते. रीमा लागू यांच्या आई मंदाकिनी भडभडे यादेखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होत्या. खरंतर, रीमा यांना अभिनयाचा वारसा हा त्यांच्या बालपणापासूनच आईकडून मिळाला होता. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना रीमा यांनी अभिनयाला सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यावसायिक अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रीमा लागू यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटातून केली होती. अनेक वर्षे त्यांनी मराठी रंगभूमीवरही काम केले.
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘अल्याड पल्याड’ पुन्हा रिलीज होणार
१९८० मध्ये रीमा लागू यांनी ‘कलयुग’ या चित्रपटातून सहायक अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रीमा लागू यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहायक भूमिकेचे काम केले आहे. रीमा कायमच सहाय्यक भूमिकांमध्येही इतका जीव ओतून काम करायच्या की, मुख्य भूमिका साकारणारा कलाकारही झाकोळला जायचा. रीमा यांचा अभिनय पाहून अनेक मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांनाही घाम फुटायचा. रीमा यांच्यासोबत अशीच एक घटना ‘गुमराह’ चित्रपट करत असताना घडली होती. या चित्रपटात रीमा यांना अभिनेत्री श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारायची होती. असे म्हटले जाते की, रीमा यांचा जबरदस्त अभिनय पाहून श्रीदेवी देखील इनसिक्योर झाल्या होत्या. म्हणूनच श्रीदेवी यांनी त्यांच्या भूमिकेला अनेक ठिकाणी कात्री लावली होती.
“सुंदरा” गाण्याचा टीझर रिलीज, गौतमीची ठसकेबाज लावणी आणि निकची खतरनाक हुकस्टेपचा होणार मिलाप
रीमा लागू यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये तब्बल २५ हून अधिक चित्रपटांमध्ये ‘आई’ची भूमिका साकारली होती. अनेक बॉलिवूड चित्रपटांत रीमा लागू मुख्य अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारताना दिसल्या होत्या. इतकंच नाही, तर रीमा लागू यांनी तब्बल सात वेळा सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटांमध्ये ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘जुडवा’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. सलमान व्यतिरिक्त रीमा लागू मोठ्या पडद्यावर अजय देवगण, शाहरुख खान, करिश्मा कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, गोविंदा, उर्मिला मातोंडकर आणि काजोल यांच्या आईची भूमिका साकारली होती.