निकालानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंवर केली सडकून टीका
महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणूकीवर बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने नुकतंच निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. अभिनेत्री म्हणते, “महाराष्ट्रात मिळालेले अभूतपूर्व यश ‘भाजपा’साठी ऐतिहासिक विजय आहे. नक्कीच आमच्या पक्षातले लोकं हे खूपच उत्साहित कार्यकर्ते आहेत. मी अवघ्या महाराष्ट्रातल्या जनतेचे आणि संपूर्ण देशातल्या नागरिकांचे मी आभारी आहे.”
विशाखा सुभेदारच्या पतीचं अभिनयविश्वात पुनरागमन! अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावरही कंगनाने भाष्य केलं आहे. ती म्हणाली की, “पक्षाची जी विचारधारा आहे, त्यासाठी एकापेक्षा एक नेतृत्व करणारे लोक आमच्याकडे आहेत. त्यामुळे याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.” त्यासोबतच अभिनेत्रीने उद्धव ठाकरेंच्या पराभावावरही भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “उद्धव ठाकरेंचा जो पराभव झाला आहे तो अपेक्षित होता. कारण दैत्यांचा पराभव होतो हे आपण इतिहास आणि पुराणांमधून पाहिलं आहे. दैत्य आणि देवता यांना आपण कसं ओळखतो? जे महिलांचा सन्मान करत नाहीत ते दैत्य असतात आणि महिलांचा जे सन्मान करतात ते देव असतात.”
#WATCH | Delhi | On Maharashtra Assembly elections, BJP MP Kangana Ranaut says, “This is a historic win for our party. All of us are very excited and we are grateful to the people of the nation…I anticipated the defeat (of Maha Vikas Aghadi)…” pic.twitter.com/O5zuzvfrWc
— ANI (@ANI) November 24, 2024
“महिलांना ३३ टक्के आरक्षणासह अनेक महिलांच्या उपयोगी योजना असतील त्या चांगल्या प्रकारे राज्यात राबवल्या गेल्या आहेत आणि राबवल्या जात आहेत. दैत्यांचं जे होतं तेच या सगळ्या विरोधकांचं झालं आहे. दैत्यांचा पराभव झाला. महाभारतात सगळे एकाच कुटुंबातले होते. पण कौरव हरलेच तसं घडलं आहे. माझं घर ज्यांनी तोडलं त्यांना फळ मिळालं असंही कंगनाने म्हटलं आहे. मला घाणेरडेपणाने बोललं गेलं, मला शिवीगाळ करण्यात आली. ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली त्यांना धडा मिळाला” अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. २८८ मतदारसंघांत झालेल्या मतदानाचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यांना २८८ पैकी २३७ जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीने फक्त ५४ जागांवर विजय मिळवला आहे. २२९ जागांमध्ये १३३ जागांवर भाजपा विजयी झाली असून शिवसेना ५६ जागांवर तर राष्ट्रवादी कॉंग्रेस ४० जागांवर विजयी मिळवला आहे.