विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हातात सोपवली नव्या कारची चावी; किंमत ऐकून डोळे विस्फारतील...
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) ह्याने काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईत आलिशान घर खरेदी केलं होतं. त्याने घर खरेदी केल्यानंतर अवघ्या इंडस्ट्रीत त्याची चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने घर खरेदी केल्यानंतर नवी अलिशान महागडी कारही खरेदी केली आहे. विवेकने ब्रँड न्यू रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत न्यू ब्रँडेड कारची झलक शेअर केली आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता आणि त्याची फॅमिली कारवरील पडदा उचलताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेता आपल्या फॅमिलीला राईड करून दाखवतानाही दिसत आहे. विवेक ओबेरॉयने सिल्व्हर-ग्रे रंगाची रोल्स रॉयसची झलक चाहत्यांना इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. कार पार्किंगमधून बाहेर काढून त्याने आपल्या आई वडिलांना बसवलं. नंतर बायकोला बसवलं. चौघांनी ब्रँड न्यू कारमधून राईड एन्जॉय केली. विवेकने कॅप्शनमध्ये लिहिले, “यश हे वेगवेगळ्या आकारात आणि साच्यात येतं, आज ते यापद्धतीने आलं आहे. आयुष्यातले हे खास क्षण कुटुंबासोबत साजरे करता येतायेत यासाठी मी कृतज्ञ आहे.”
विवेकने कारमधून आई, वडील सुरेश ओबेरॉय आणि पत्नी प्रियांका अल्वासोबत सैर केली. सुरेश ओबेरॉय यांनी न्यू ब्रँडेड कार पाहून लेकाला मिठी मारली. विवेक ऑबेरॉयची नवीन कार पाहून फक्त चाहत्यांनीच नाही तर त्याच्या अनेक सेलिब्रिटी फ्रेंड्सनेही व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. विवेक ओबेरॉय कधी मुंबईत तर कधी दुबईत राहतो. रियल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्याची बरीच गुंतवणूक आहे. तो शिवाय, फिल्म मेकिंगमधूनही रग्गड पैसा कमावतो. यापूर्वी अभिनेत्याकडे लॅम्बॉर्गिनी आणि मर्सिडीज या कारचंही कलेक्शन आहे.
तुझं यश पाहून बरं वाटतंय, तू या आनंदासाठी पात्र आहेस, असंच पुढे जात राहा, तू असाच पुढे जा, अशीच तुझी प्रगती व्हावी हीच माझी सदिच्छा… अशा कमेंट्स चाहत्यांच्या आहेत. तर राखी सावंतनेही फायर इमोजी कमेंट केली आहे. विवेकने ऑबेरॉयने रोल्स रॉयस न्यू ब्रँडेड कार दुबईत खरेदी केली आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, विवेकने खरेदी केलेल्या ब्रँड न्यू कारचं नाव Rolls Royce Cullinan Black Badge असं असून त्या कारची किंमत तब्बल १२.२५ कोटी एवढी आहे.