
मृणाल ठाकूरने का मागितली बिपाशीची जाहीर माफी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मृणालने इन्स्टावर जाहीरपणे मागितली माफी
मृणालचा जाहीर माफीनामा
मृणाल ठाकूरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट शेअर केली, ज्यामध्ये तिने सांगितले की तिचा कधीही बॉडी शेम करण्याचा हेतू नव्हता. मृणाल ठाकूरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये माफी मागितली आणि म्हणाली, “१९ वर्षांची किशोरवयीन असताना मी काही खूप विचित्र गोष्टी बोललो. मला समजले नाही की माझा आवाज आणि शब्दांची निवड, अगदी मस्करीतही, एखाद्याला इतके दुखवू शकते. पण तसे झाले आणि मी यासाठी मनापासून माफी मागते. माझा हेतू कधीही कोणालाही बॉडी शेम करण्याचा नव्हता. एका मुलाखतीत मजेदार पद्धतीने बोललेल्या या गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. पण आता मला समजले की ते काय आहे आणि मला त्यावेळी मी शब्द वेगळे निवडले असते तर बरे झाले असते.”
मृणाल ठाकूर इथेच थांबली नाही. बिपाशा बसूची माफी मागताना तिने पुढे लिहिले, “काळानुसार मी सौंदर्याचे कौतुक करू लागले आहे, मग ते कोणत्याही स्वरूपात आले तरी आणि आता मला ही गोष्ट सर्वात जास्त आवडते.”
काय होते नेमके प्रकरण
मृणाल ठाकूरचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ती बिपाशा बासूबद्दल बोलत तिच्या मसल्सबाबत उल्लेख करत आहे आणि बॉडी शेमिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिपाशानेदेखील मृणालचे नाव न घेता तिच्या या व्हिडिओवर टीका केली होती. बिपाशाने इंडस्ट्रीत आपले नाव स्वतः निर्माण केले आहे, त्यामुळे मृणालवर प्रचंड प्रमाणात टीका झाल्याचे दिसून येत आहे.
हीना खानची प्रकरणात उडी
हिना खानने दिला मृणालला पाठिंबा
आता टीव्ही अभिनेत्री हिना खाननेही या संपूर्ण प्रकरणात उडी घेतली आहे. तिने मृणालला माफी मागितल्याबद्दल पाठिंबा दिला आहे. अभिनेत्रीने म्हटले आहे की तिला मृणालचा अभिमान आहे कारण तिने तिची चूक मान्य केली आहे. हिनाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
हीना खा म्हणाली, ‘मीही चुका केल्या आहेत’, पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, ‘ज्ञान हे ज्ञानाच्या झाडाचे फळ आहे जे अनुभवांमध्ये रुजलेले आहे. आपले सामाजिक कौशल्य, संवाद आणि समजुतीची खोली काळानुसार येते. आपण सर्वजण चुका करतो, विशेषतः जेव्हा आपण तरुण असतो. मी मृणालची परिस्थिती समजू शकते, कारण भूतकाळात मीही अनेक मूर्खपणाच्या चुका केल्या आहेत.’