हल्ला झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानला काय म्हणाली ? चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतेच सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत, ज्याचा खुलासा अखेर करण्यात आलेला आहे. १५ जानेवारीच्या दिवशी मध्यरात्री सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर अभिनेत्यावर मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये सर्जरीही करावी लागली होती. त्यानंतर आता अभिनेत्याची तब्येत व्यवस्थित आहे. या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता अभिनेत्यावर हल्ला करणारा मोहम्मद शीरफुल फकीरच्या विरोधात १६१३ पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. हल्ला झाल्यानंतर करीनाने तो सगळा प्रसंग पाहिला आणि ती त्याला काय म्हणाली होती? हे आता समोर आलं आहे. पोलिसांच्या चार्जशीटमध्ये यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.
ACP प्रद्युम्न यांची CID मध्ये होणार दणक्यात एन्ट्री, चाहत्यांच्या आग्रहास्तव मेकर्सचा निर्णय
सैफ अली खानवर नेमका हल्ला कसा झाला ?
हल्लेखोराने सैफच्या घरात चाकू घेऊन एन्ट्री केली होती. घरात घुसण्याचा त्याचा मुख्य मुद्दा चोरी करण्याचा होता. पण त्याचा मुख्य हेतू काही पूर्ण झाला नाही. त्यानंतर सैफमध्ये आणि त्याच्यात झटापट झाली. या झटापटीत अभिनेत्याच्या अंगावर काही छोटे मोठे वार या हल्लेखोरानी केले. जेव्हा मोहम्मद शरीफ हा हल्लेखोर सैफच्या घरात घुसला, त्यावेळी करीना, स्वत: सैफ, तैमुर आणि जेह हे सर्व घरात होते. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने तिकडून पळ काढला. त्यानंतर तीन दिवस तो हल्लेखोर मुंबई आणि मुंबईसह उपनगरांत तो लपून बसला होता. त्याला मुंबई पोलिस आणि ठाणे पोलिसांनी ठाण्याच्या वागळे इस्टेटच्या इथून अटक केली.
‘शिल्पा शेट्टी, तुझसे मेरी नजर नहीं हटती’ लाल रंगात हुस्नपरी
दरम्यान, ज्यावेळी सैफवर हल्लेखोराने हल्ला केला त्यावेळी करीना अभिनेत्याला काय म्हणाली, याचा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर करीनाने सैफला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं. ती सैफला म्हणते, “सैफ तू आधी त्याला सोड आणि खाली ये. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया… तुला झालेल्या जखमांकडे लक्ष दे.” रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या पतीला करीनाला काही सुचत नव्हतं. त्यानंतर करीनाने आपली दोन्हीही मुलं (तैमूर आणि जहांगीर) आणि घरातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत ना ? याची खातर जमा केली. त्यानंतर तिने सैफला लिफ्टने खाली घेऊन आली. तोपर्यंत हल्लेखोराने पळही काढला असल्याचं तिला अगदी नंतर लक्षात आलं. त्यानंतर करीनाने सैफला रिक्षाने लीलावती रुग्णालयात दाखल केले.
प्रतीक बब्बरचा सावत्र भावासोबतचा वाद संपला ? आर्य बब्बरच्या फोटोने वेधले लक्ष…
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सैफचा जबाब, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि ४० हून अधिक साक्षीदारांच्या जबाबांचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनुसार करीनाने हे सांगितलं की, सैफने हल्लेखोरासोबत मुकाबला घरातच केला होता. तो कोण आहे? त्याला काय पाहिजे ? या प्रश्नांचे उत्तर त्याच्याकडून आल्यानंतर सैफने हल्लेखोराला पकडण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी हल्लेखोराने सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर अनेक वार केले. करीना तेव्हा जहांगीर, तैमूर आणि एलिम्मा (केअरटेअकर) यांना घेऊन बाराव्या मजल्यावर असलेल्या खोलीत पळाली. त्यानंतर सैफही त्या खोलीत आला तेव्हा तो रक्ताने माखला होता. त्याच्या पाठीतून, मानेतून रक्त येत असल्याचा खुलासाही त्या आरोपपत्रात आहेत.
आता होणार फुल टू राडा; सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित…
यासह अनेक खुलासे मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सैफचा जबाब, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि ४० हून अधिक साक्षीदारांच्या जबाबांचाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, सर्जरी केल्यानंतर सैफच्या पाठीतून डॉक्टरांनी चाकूचा बराच मोठा भाग काढला. त्यानंतर अभिनेत्याची तब्येत आता व्यवस्थित आहे. १९ जानेवारीला पोलिसांनी मुंबईच्या नजिक असलेल्या ठाणे शहरातून सैफच्या हल्लेखोराला अटक करण्यात आली. अभिनेत्याच्या हल्ला प्रकरणाची संपूर्ण माहिती या आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.