Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई-मुलीच्या नात्याचा सुरेल स्पर्श’; अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील ‘सांग आई’ गाणं झालं प्रदर्शित!

‘सांग आई’ हे अवधूत गुप्ते यांचं नवीन गाणं संगीतप्रेमींसाठी नुकतंच प्रदर्शित झालं आहे. आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं हे गाणं त्यांच्या ‘आई’ या अल्बममधील अखेरचं गाणं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 13, 2025 | 04:48 PM
‘आई-मुलीच्या नात्याचा सुरेल स्पर्श’; अवधूत गुप्ते यांच्या 'आई' अल्बममधील ‘सांग आई’ गाणं झालं प्रदर्शित!

‘आई-मुलीच्या नात्याचा सुरेल स्पर्श’; अवधूत गुप्ते यांच्या 'आई' अल्बममधील ‘सांग आई’ गाणं झालं प्रदर्शित!

Follow Us
Close
Follow Us:

आई आणि मुलीचं नातं हे अतूट, भावनिक आणि नेहमीच थोडं वेगळं असतं. या नात्यात गोडवा असतो, तर कधी रुसवे-फुगवेही. मुलगी नेहमीच आपल्या आईचं अनुकरण करत असते. तिचं वागणं बोलणं, घराची काळजी घेणं आणि कधी आई घरी नसली तर तिच्या जागी आईसारखं वागण्याचा प्रयत्न करणं. हे सगळं एका सुरेल गाण्यातून उलगडलं आहे. ‘सांग आई’ हे अवधूत गुप्ते यांचं नवीन गाणं संगीतप्रेमींसाठी नुकतंच प्रदर्शित झालं आहे. आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं हे गाणं त्यांच्या ‘आई’ या अल्बममधील अखेरचं गाणं आहे.

अभिनेता Tanuj Virwani च्या घरी झाली चोरी, जवळच्या व्यक्तीने कोट्यवधींच्या वस्तुंवर मारला डल्ला

एकविरा म्युझिक प्रस्तुत या गाण्याचं संगीत अवधूत गुप्ते यांचं असून, अर्थपूर्ण शब्द प्रशांत मडपुवार यांनी लिहिले आहेत. या हृदयस्पर्शी गाण्याचं संगीत संयोजन अनुराग गोडबोले यांनी केलं आहे. ‘सांग आई’चं दिग्दर्शन शोनील यलट्टीकर यांनी केलं असून, यात पूर्णिमा डे आणि मायरा स्वप्नील जोशी मायलेकीच्या भूमिकेत दिसत आहेत. या गाण्याच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांची मुलगी मायरा जोशी हिने मनोरंजन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. वडिलांकडून अभिनयाचा वारसा लाभलेल्या मायराने आपल्या पहिल्याच कामात संवेदनशील अभिनय सादर करून रसिकांचे लक्ष वेधले आहे. तिचा चेहर्‍यावरचा भाव, सहज अभिनय, आणि आई-मुलीच्या बंधाचा उत्कट भाव मांडण्याची पद्धत खरोखर कौतुकास्पद आहे.

‘सांग आई’बद्दल भावना व्यक्त करताना अवधूत गुप्ते म्हणतात, “आई-मुलीचं नातं बघताना मला अनेक भावनिक क्षण आठवतात. ‘सांग आई’ हे गाणं माझ्या मनापासून आलं आहे. स्वप्नील जोशीची मुलगी मायरा हिला या गाण्यात घेण्यामागचं कारणही भावनिक आहे. मायरा ही गाण्यासाठी योग्य निवड होती कारण तिच्या डोळ्यांत गोड भाव आहे आणि ती नैसर्गिक अभिनय करते. स्वप्नील हा केवळ माझा चांगला अभिनेता नाही, तर एक संवेदनशील वडीलही आहे. मायरा त्याच्याच गुणांचा वारसा घेऊन आली आहे. त्यामुळे ‘सांग आई’ साठी ती परिपूर्ण होती. आईचं अनुकरण करताना मुलीमध्ये निर्माण होणारी ती भावना, ती साद घालायचा मी प्रयत्न केला आहे.

भैरवी आणि अनिश वटपौर्णिमेच्या दिवशी घेणार सप्तपदी, होणार एकमेकांचे जीवनसाथी…

या गाण्याचे बोल जितके भावनिक आहे. तितकेच त्याचे सादरीकरणही खूपच कमाल आहे. सुंदर छायाचित्रण, सौंदर्यपूर्ण फ्रेम्स आणि हृदयस्पर्शी संगीताने हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच भावणारे आहे.

Web Title: Music composer and sung avadhut gupte saang aai song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Marathi Film Industry
  • viral Song

संबंधित बातम्या

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद
1

इशा मालविया आणि अभिषेक कुमार पुन्हा एकत्र! ‘नी तू बार-बार’ गाण्याला जबरदस्त प्रतिसाद

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना
2

‘मी डिप्रेशनमध्ये असताना लिहिलं होतं गाणं…’ सैय्यारा गाण्यामागे दडल्या आहेत गायकाच्या खऱ्या भावना

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर
3

रत्नाकर मतकरींच्या भयकथेतून डॉ. गिरीश ओक प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नाटकाची रिलीज डेट जाहीर

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा
4

“आराम कोणाला आवडत नाही? पण कम्पल्सरी…” अभिनेत्री सुखदा खांडकेकरला एक साधी चुक पडली महागात; पोस्ट शेअर करत सांगितला किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.