
मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसानिमित्त रितेशवर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान रितेशची पत्नी जिनिलिया हिने पती रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सध्या रितेश आणि जिनिलिया या दोघांचा मराठी चित्रपट ‘वेड’ (Ved Movie)प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. ३० डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून जिनिलिया या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. तर ‘वेड’ या चित्रपटातून रितेश दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहे. जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘वेड’ चित्रपटाच्या शूटिंग वेळेचे काही खास क्षण टिपण्यात आले आहेत. यात रितेश देशमुखच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा दिसून येत आहेत.
जिनिलियाने व्हिडीओ पोस्ट करत लिहिले,
मी तुझ्यावर प्रेम करते कारण मी तुझ्यावर प्रेम करते?
कारण तुझ्यावर प्रेम न करणे अशक्य आहे?
मी तुझ्यावर गणनेशिवाय प्रेम करतो, कारण चांगले की वाईट
मला तुझ्यावर प्रेम करणे आणि श्वास घेणे यापैकी निवड करावी लागली
तर मी तुझ्यावर प्रेम करते हे सांगण्यासाठी मी माझा शेवटचा श्वास घेईन
प्रिय @riteishd वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा