"तो इमोशनल ड्रामा नको होता, त्यामुळे..."; 'द व्हिजिटर'ची स्टोरी कशी सुचली ? नक्षत्र बागवेने सांगितला 'तो' किस्सा
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक नक्षत्र बागवे सध्या त्याच्या अपकमिंग वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. त्याच्या ‘नक्षत्र बागवे’ ह्या युट्यूब चॅनलवर ‘द व्हिजिटर’ (The Visitor)नावाची वेबसीरीज रिलीज करण्यात आली आहे. या वेबसीरीजचे आजावर एकूण तीन सीझन रिलीज झाले आहेत. त्या तीनही सीरीजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या घवघवीत यशानंतर नक्षत्र बागवेच्या अपकमिंग सीरीजचा चौथा सीझन रिलीज झाला आहे. यानिमित्त नक्षत्र बागवेने नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने आपल्या वेबसीरीजबद्दल दिलखुलास चर्चा केली.
ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, ७ दिवसात काढून घेतलं महामंडलेश्वर पद!
मुलाखतीत नक्षत्रने वेबसीरीजच्या कथानकाबद्दल भाष्य केले. त्याशिवाय त्याचा सीरीज करण्यामागे नेमका हेतू काय होता यावरही भाष्य केले आहे. नवराष्ट्र डिजीटलसोबत संवाद साधताना अभिनेता म्हणाला की, “एखादा व्यक्ती जेव्हा कोणत्याही ठिकाणी तो फिरायला जातो, तेव्हा तो ‘व्हिजिटर’ म्हणून ओळखला जातो. मी या सीरीजमध्ये नक्ष नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे. मी या सीरीजमध्ये एका ‘व्हिजिटर’ची भूमिका साकारलीये. तो एका ट्रॅव्हल मॅग्झिनमध्ये कंटेंट रायटर म्हणून काम करतो. ‘द व्हिजिटर’ या सीरीजचे माझे आतापर्यंत चार सीझन आलेले आहेत. या चारही सीझनमध्ये नक्ष देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आलेला आहे. या राज्यांमध्ये तो जाऊन लोकांना माहित नसलेली पर्यटनाची माहिती गोळा करत असतो. हे पात्र समलैंगिक (Gay) आहे.
“हे पात्र साकारत असताना, लोकांना माहित नसलेली पर्यटनाची माहिती गोळा करत असताना तो तिथल्या स्थानिक लोकांना ही भेटतो. हिच ‘द व्हिजिटर’ची स्टोरी आहे. काही गोष्टी ना खूप साध्या असतात आणि त्या आपल्यातच असतात. ह्या सीरीजचं कथानक मी माझ्या दैनंदिन आयुष्यात जगत होतो. दररोजच्या आयुष्यात जगत असलेल्या गोष्टी मी स्क्रिनवर दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळेच माझे अनेक प्रोजेक्ट्स माझे टार्गेट ऑडियन्स आहेत. जेव्हा कुठलीही गे व्यक्ती ट्रॅव्हलिंग करत असताना एका डेटिंग ॲपवर असते, तेव्हा ती त्या ॲपवर ‘व्हिजिटर’ नावाची प्रोफाईल बनवत असते. आणि आम्ही आमचं नाव बदलून आमच्या प्रोफाईलचं नाव ‘व्हिजिटर’ करतो. माझ्या संपूर्ण रियल लाईफमधले काही किस्से या सीरीजमध्ये उलगडलेय. मी ट्रॅव्हलिंगला खूप प्राधान्य दिलेय. मला इमोशनल ड्रामा नको होता. त्यामुळे मी LGBTQ, पर्यटन आणि रिॲलिटी प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी या सीरीजची शुटिंग महाराष्ट्रातल्या कोल्हापूरात, गुजरातच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, गोव्यातल्या माहित असलेल्या आणि न माहित असलेल्या ट्रॅव्हल स्पॉटला आम्ही भेट दिली आणि चौथी सीरीज राजस्थानमध्ये शुटिंग केली होती.”