प्रसिद्ध रॅपर अडकला दुसऱ्यांदा लग्नबंधनात; घटस्फोटाच्या ५ वर्षांनी चढला लग्नाच्या बोहल्यावर, होणारी बायको कोण आहे?
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटायने गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. एमीवेने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर करत चाहत्यांसोबत लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. रॅपर एमीवे बंटाय अभिनेत्री आणि गायिका स्वालिनासोबत लग्नबंधनात अडकला. त्यानंतर आता प्रसिद्ध रॅपर रफ्तारही बोहल्यावर चढला आहे. त्याच्या लग्नातले फोटोज् आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काल सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका वैगेरे असे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते त्यातून रफ्तार पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकल्याचे बोलले जात होते.
रफ्तार दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे, लग्नानंतरचा पहिला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, रफ्तारनं गर्लफ्रेंड मनराज जवांदासोबत (Raftaar Marries Manraj Jawanda) नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. मात्र दोघांनीही लग्नाची भनक कोणालाही लागू न देता गुपचूप लग्न उरकले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रफ्तारने आपल्या खासगी आयुष्याची सुरुवात अगदी जोमात पद्धतीने केलेली आहे. रफ्तारच्या लग्नातील फोटो त्याच्या फॅन पेजकडून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यांनी शेअर केलेल्या पेजवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे. रफ्तार आणि मनराजवर चाहत्यांडून शुभेच्छा आणि आशिर्वादांचा वर्षाव होत आहे.
रफ्तार घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. फॅशन स्टायलिस्ट मनराज जवंदाबरोबर रफ्तारने लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या प्री-वेडिंगच्या जल्लोषाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले असून चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत. रफ्तारच्या लग्नाची बातमी वाचून चाहते आनंदी आणि उत्साही झाले आहेत. दरम्यान, मनराज ही एक फॅशन स्टायलिस्ट आणि अभिनेत्रीही आहे. तर, रफ्तारचं खरं नाव दिलिन नायर आहे. त्याचं स्टेज नाव रफ्तार असं आहे. रफ्तारने लग्नाविषयी कोणतीही प्रतिक्रियाही दिलेली नाही आणि फोटोही शेअर केलेले नाहीत. रफ्तारचं हे दुसरं लग्न आहे. रफ्तारचं पहिलं लग्न काही वर्षातंच मोडलं.
अभिमानास्पद! मुंबईतल्या रस्त्याला ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे नाव; अभिनेते अजिंक्य देव भावूक
दरम्यान, डिसेंबर २०१६मध्ये रफ्तारने कोमल वोहराशी पहिलं लग्न केलं होतं. या लग्नाच्या आधी दोघं पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण लग्नाच्या काही वर्षांनी २०२०मध्ये रफ्तारने कोमलबरोबर घटफोस्ट घेण्याचं निश्चित केलं. परंतु, कोरोनामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेत विलंब झाला. त्यामुळे रफ्तार आणि कोमलने २०२२मध्ये घटस्फोट घेतला. ६ ऑक्टोबर २०२२ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली.