Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टार प्रवाहच्या ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेने रचला नवा विक्रम

स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या मालिकेने नवा विक्रम रचला आहे. या संबंधित मालिकेचे अभिनेते देवदत्त नागे आणि स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 19, 2024 | 07:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेने पहिल्याच दिवशी ४.५ टीव्हीआर मिळवत टेलिव्हिजनच्या इतिहासात सायंकाळी ६.३० वाजता सर्वोच्च टीव्हीआर मिळवणारी मालिका म्हणून विक्रम केला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांवरील श्रद्धा आणि त्यांचा महिमा मांडणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.

हे देखील वाचा : विनीत कुमार झळकणार सनी देओलसह मोठ्या पडद्यावर, ‘जाट’ चित्रपटाचे पोस्टर झाले रिलीज!

या महामालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘साडे तीन शक्तिपीठे आपली श्रद्धास्थानं आहेत. ही फक्त देवी नसून आपल्या साऱ्यांची आई आहे. ही गोष्ट सादर करताना कृतज्ञता जाणवतेय. पहिल्या भागापासून मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम अतिशय अविस्मरणीय आहे. मोठी जबाबदारी आहे. तिन्हीसांजेला देवी आई घरात येऊन संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत आहे. या मालिकेच्या उद्देश घरबसल्या लोकांना शक्तिपीठांची यात्रा घडवणे तसेच त्याबद्दल माहिती पुरवणे आहे. आपली परंपरा जोपासण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा नेहमीच प्रयत्न असते. ही मालिकाही अशीच संस्कार मूल्य आणि करमणुकीची सांगड बांधून सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी भावना सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.’

या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे भगवान शिवशंकराची भूमिका साकारत असून, त्याने मालिकेच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणाला कि, “देवीच्या आशीर्वादामुळेच हा इतिहास घडवू शकलो. मालिकेला भरभरुन प्रेम दिल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचे आभार. टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. टीव्ही हे प्रेक्षकांच्या मनात पोहचण्याचे माध्यम आहे. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे.”

हे देखील वाचा  :कोण आहे करोलिना गोस्वामी? ध्रुव राठीच्या चाहत्यांनी फटकारल्यानंतरही परतली भारतात!

मालिकेत आदिशक्तीची विविध रूपे अभिनेत्री मयुरी कापडणे साकारत असून, ती माहुरची देवी रेणुका, कोल्हापुरची अंबाबाई, तुळजापुरची भवानी आणि वणीची सप्तशृंगी अशा देवींच्या भूमिका करणार आहे. मयुरीने देवीच्या आशीर्वादामुळे ही संधी मिळाल्याचे सांगितले आणि पौराणिक मालिकेत काम करण्याचा अनुभव खूप खास असल्याचे व्यक्त केले. लवकरच माहुरच्या रेणुकामातेचा अवतार मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Web Title: New record is created by ude gan ambe katha saadetin shaktipeethanchi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 07:59 PM

Topics:  

  • star pravah

संबंधित बातम्या

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग
1

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग

Star Parivaar Awards 2025: दिमाखदार सोहळ्यासह साजरा होणार स्टार प्लसची गौरवशाली २५ वर्षे, कलाकारांची लागणारी हजेरी
2

Star Parivaar Awards 2025: दिमाखदार सोहळ्यासह साजरा होणार स्टार प्लसची गौरवशाली २५ वर्षे, कलाकारांची लागणारी हजेरी

‘स्टार प्रवाह’ वरील ‘या’ मालिका येत्या सोमवारपासून होणार बंद? नक्की कारण काय?
3

‘स्टार प्रवाह’ वरील ‘या’ मालिका येत्या सोमवारपासून होणार बंद? नक्की कारण काय?

ठरलं तर मग! मालिकेत झळकणार नवी पूर्णा आजी ? कोण आहे ही ज्येष्ठ अभिनेत्री ?
4

ठरलं तर मग! मालिकेत झळकणार नवी पूर्णा आजी ? कोण आहे ही ज्येष्ठ अभिनेत्री ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.