(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘मुक्काबाज’ सारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी अभिनयासाठी ओळखला जाणारा विनीत कुमार सिंग अभिनेता सनी देओलसोबत आगामी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. ‘SDGM’ असे तात्पुरते शीर्षक असलेल्या या चित्रपटाला आता अधिकृतपणे ‘जाट’ असे नाव देण्यात आले आहे. सनी देओलच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी या चित्रपटाच्या शीर्षकाचे अनावरण करण्यात आले आहे. विनीत कुमार सिंह यांनी पोस्टर त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आणि कॅप्शन दिले, “मॅसिव ॲक्शनसाठी राष्ट्रीय परमिट असलेल्या माणसाची ओळख करून देत आहे JAAT मध्ये सनी देओल SDGM म्हणजेच ‘जाट’ हॅपी बर्थडे ॲक्शन सुपरस्टार.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
Mythri Movie Makers आणि People Media Factory द्वारे निर्मित हा चित्रपट विनीत कुमारचा सनी देओलसोबतचा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. हा चित्रपट “देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट” म्हणून ओळखला जात आहे आणि गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी, विनीत कुमार सिंग या चित्रपबाबत म्हणाले की, ‘ॲक्शन चित्रपटाचा भाग होण्यासाठी मला “खरोखर धन्य” आणि “उत्साही” वाटते.
त्यांनी सनी देओलबद्दल एक वैयक्तिक गोष्ट देखील शेअर केली आणि ते म्हणाले, “सनी सर मोठ्या भावासारखे आहेत. मी आणि माझा मित्र त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याच्या चित्रपटाची ब्लॅकने तिकिटे खरेदी करायचो. त्याच्यासोबत ॲक्शन सीन करताना मला खूप सुरक्षित वाटले. सनी सरांकडून मला ॲक्शनमध्ये खूप काही शिकायला मिळाले. आम्ही त्याच्या वाढदिवशीही शूटिंग करत आहोत आणि पॅकअपनंतर त्याचा वाढदिवस साजरा करू.” असे ते म्हणाले. या चित्रपटात रणदीप हुड्डा, सैयामी खेर आणि रेजिना कॅसँड्रा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत आणि हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.
हे देखील वाचा – सलमान आणि आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार, ‘इंशाअल्लाह’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार?
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, सनी देओल आणि अभिनेता विनीत नवीन काय घेऊन येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सध्या, सिंग ‘सुपरबॉय ऑफ मालेगाव’ चे यश साजरे करत आहेत, ज्याला त्याच्या TIFF 2024 प्रीमियरमध्ये जबरदस्त प्रशंसा मिळाली. कंवर खटाना यांच्या ‘द गेम बिहाइंड सॅफरॉन टेरर’ या पुस्तकावर आधारित ‘मॅच फिक्सिंग’ या राजकीय थ्रिलरसाठीही त्याने साइन इन केले आहे. चित्रपट निर्मात्यांनी कथेचे सार टिपून चित्रपटातील सिंगचा एक धक्कादायक फर्स्ट लुक अनावरण केला. ‘मॅच फिक्सिंग’ 15 नोव्हेंबर रोजी चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये सहकलाकार अनुजा साठे आणि मनोज जोशी आहेत. याशिवाय तो ‘रंगीन’मध्येही दिसणार आहे.