
nora fatehi
अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही फार अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नोरानंतिच्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती पण आज ती अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. नुकतंच तिनं एका मुलाखती दरम्यान तिच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढली. नोरानं सांगितलं की जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिच्याकडे फक्त 5 हजार रुपये होते. नोराला इंडस्ट्रीमध्ये काय काय संघर्ष करावा लागला जाणून घ्या
[read_also content=”रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवरील व्हिडीओ आला समोर, अयोध्या दाखवण्यासाठी खर्च केले ‘इतके’ कोटी रुपये! https://www.navarashtra.com/movies/video-of-the-set-of-ranbir-kapoor-film-ramayana-goes-viral-crores-were-spent-to-show-ayodhya-nrps-520751.html”]
दिलबर गर्ल नोरा फतेही नुकतीच ‘मडगाव एक्सप्रेस’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील नोराची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. नोरा फतेहीला चित्रपटात कमी वेळ मिळाला असला तरी तिने कमी वेळात चांगली स्क्रीन प्रेझेन्स दाखवला आहे.
Mashable India’s Bombay Journey च्या नवीन एपिसोडमध्ये नोरा तिच्या पुर्वीच्या दिवसांबद्दल बोलली. तिनं सांगितलं की, जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. तिची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्या दिवसांत मी पाच हजार रुपये घेऊन भारतात आले. मी मुंबईत 9 मुलींसोबत थ्री बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते, असं ती म्हणाली.
नोरा पुढे म्हणाली की त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की, मी दिवसभरात एक अंड, ब्रेड खाऊन आणि दूध पिऊन राहायची. असे मी बरेच दिवस जगले. मी त्यावेळी एका एजन्सीत काम करत होती. जी माझ्या घराचे भाडे भरायची आणि तिचे कमिशन कापायची. तो काळ माझ्यासाठी वाईट होता. त्यावेळी मला थेरपीची गरज सुद्धा भासली होती.
नोरा फतेहीने 2014 मध्ये ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तो ‘बाहुबली: द बिगिनिंग’च्या ‘मनोहरी’ या डान्स नंबरमध्ये ती दिसली होता. यानंतर नोरानं मागं वळून पाहिले नाही. तिने दिलबर दिलबर, है गरमी इत्यादी सुपरहिट गाण्यांवर डान्स केला.