या वर्षाच्या सुरुवातीपासून मनोरंजन सृष्टीत लग्नाचा सिझन सुरू झाला. अनेक सेलेब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. नुकतचं अभिनेत्री रकुल प्रित सिंग जॅका भगनानीसोबत (Rakul Preeet Singh) तर अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu wedding) बॅायफ्रेंड मैथियास बोए सोबत विवाहबंधनात अडकली. आता बॅालिवूडची आणखी एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरीनं (aditi rao haidari) अभिनेता सिद्धार्थसोबत हैदराबादमधील एका मंदिरात गुपचूप लग्न केलं. तिच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी आणि तिच्या प्रियजनांकडून लग्नासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, अदितीच्या आधीही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध स्टार्स गुपचूप लग्न करून चर्चेत (Stars Who Married Secretly) आले आहे, तुम्हाला माहित आहे का, कोण आहेत हे स्टार्स.
[read_also content=”पुन्हा चालणार ‘मिस्टर इंडिया’ ची जादू? सिक्वेलबाबत काय म्हणाले बोनी कपूर, दिलंय हे अपडेट! https://www.navarashtra.com/latest-news/boney-kapoor-confirms-mr-india-2-biggest-update-so-far-shared-on-film-details-inside-519236.html”]
गुपचूप लग्न करण्याच्या यादीत पहिलं नाव आहे अभिनेत्री अमृता रावचं. अमृताने आरजे अनमोलसोबत गुपचूप लग्न केलं. त्यांच्या लग्नाची बातमी दोन वर्षांनी चाहत्यांना आली.
या यादीत पुढचे नाव आहे बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचं. यामीनं 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरसोबत गुपचूप लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. यामीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या लग्नाची माहिती दिली होती.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सना शेखने इंडस्ट्री वगळता सर्वांनाच चकित केलं. यानंतर २०२० मध्ये सनाच्या लग्नाचा फोटो समोर आला. सनाने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. सनाचे लग्न अगदी गुपचूप पार पडलं.
अभिनेता जॉन अब्राहमने प्रिया रुंचालसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. लग्नानंतर काही दिवसांनी जॉनने चाहत्यांना याची माहिती दिली.
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे लग्नही अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडलं. राणीनं यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माता आदित्य चोप्राशी लग्न केलं, ज्याची चाहत्यांना खूप दिवसांनी माहिती मिळाली.