Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचे आकर्षक पोस्टर प्रदर्शित

रक्षाबंधन सणानिमित्त 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटाचे लक्ष वेशून घेणारे आकर्षक असे पोस्टर लाँच करण्यात आले. या पोस्टरमध्ये संत ज्ञानेश्वर तसेच त्याची बहीण मुक्ताई यांचे अतूट नाते दाखवले गेले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 20, 2024 | 05:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण आहे. आई-वडीलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्या मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले आणि प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने दटावले देखील. निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते. या चारही भावंडांच्या चरित्रात पावलो पावली बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा प्रत्यय देणारे प्रसंग दिसतात. प्रत्येक प्रसंगात मुक्ताई आणि तिचे तीनही भाऊ एकमेकांना सांभाळताना, जपताना दिसतात.

उदाहरणार्थ, मुक्ताईच्या अपमानामुळे व्यथित न होता तुच्या शब्दाचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीची लाही लाही करून मांडे भाजले. गावात होणाऱ्या अपमानामुळे दुःखी झालेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला लावून ज्ञानेश्वरी लिहायला प्रेरणा मुक्ताईने दिली. हीच कथा वेळोवेळी मुक्ताईला आध्यात्मिक बाबतीत महत्त्व देणाऱ्या तिच्या गुरुबंधू निवृत्तीनाथांच्या बाबतीतही पहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताईचे नाते कोणत्याही काळाच्या पलीकडचे, लोभसवाणे असे होते.

याच विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या निरागस, निष्पाप आणि पवित्र नात्याचा उलगडा दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” या चित्रपटात होताना दिसणार आहे. माउली ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई या भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे आकर्षक पोस्टर रक्षाबंधनाच्या मंगल दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट नववर्षारंभी ३ जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी, निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहेत.

या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए. फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे, तर संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे यांनी केले आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांनी घेतली आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर, ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर, पार्श्वसंगीत शंतनू पांडे आणि साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत, आणि केतकी गद्रे अभ्यंकर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.

Web Title: On the occasion of rakshabandhan the a poster of the movie sant dnyaneshwaranchi muktai was released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 05:54 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध
1

Kolhapur News : नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; सामाजिकआशयाच्या एकांकिकांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

एन.डी. स्टुडिओत नव्या पर्वाची सुरुवात; महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात
2

एन.डी. स्टुडिओत नव्या पर्वाची सुरुवात; महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
3

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
4

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.