
एन.डी. स्टुडिओत नव्या पर्वाची सुरुवात; महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात
शासनाकडून नवोन्मेष उपक्रमांची सुरुवात
अतिरराष्ट्रीय स्तरावरील समातकीर्त कलाकाराचे एखादे कार्य जर अपूर्ण राहीले असेल तर शामनाची जवाबदारी असते की त्या कार्याला पूर्णत्वास नेण्यात मदत करावी, त्यामुळेया पाच दृष्टिकोनातून स्थ. नितीन चंद्रकांत देसाई या मराठी कलाकाराच्या कर्जत येथील, एन डी स्टुडिओची जवाबदारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारून तेथे नवोन्मेष उपक्रमांची सुरुवात केली आहे.
खेळीमेळीच्या वातवरणात पार पडले ‘कार्निव्हल
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती स्वाती म्हरी-पाटील यांची संकल्पना, आणि महामंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या पुढाकारातून तसेच एनडी आर्ट वल्र्ड मधील कर्मचारी याच्या सहकार्यातून सात दिवस मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामवंत व लोकप्रिय वेगवेगळ्या सिने कलाकारांच्या उपस्थितीत एन्ही आर्ट वर्ल्ड मध्ये अतिशय आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात ‘कार्निव्हल’ हा उपक्रम पार पडला.
४२ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ अभिनेत्री? पतीसमोरच व्यक्त केली लग्नाची इच्छा
‘आय डे केअर’ मुलांच्या हस्ते झाले उद्घाटन
शासनातर्फे कोणलाही उपक्रम करताना सामाजिक जानिश्वेचे भान ठेवून, कार्निव्हलचे औपबारिक उद्घाटन पेण येथील आय डे केअर’ ह्या विशेष अब मुलांच्या संस्थेतील काही अंध मुलांच्या हाताने आकाशात फुगे सोडून महामंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित पर्यटकांच्या समवेत करण्यात आले. ३१ डिसेमारला समारोप कामशेत लोणावळे येथील ‘मायेचा हात सोशल फौंडेशन’ या संस्थेतील अनाथ मुलांच्या उपस्थित व महामंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित पर्यटकांच्या समवेत करण्यात आले. लहान मुलांसाठी सान्ताकॉलज, वेगवेगळे शुभंकर, फुगे, चॉकलेट्स, चालीं जादूगराचे जादूचे प्रयोग, कुंभारकाम, ट्याटू, पपेट शी, लहान गाजी, खेळांची साधने, इत्यादी तसेच एन डी मधील वेगवेगळ्या सेटस ची सफर, खाद्य पदार्थ, गाणी, नृत्य, स्पर्धा इत्यादी गोष्टींची धम्माल होती. या पुढेही वेगवेगळ्या दिवशी असे विशेष विविध उपक्रम, कार्यशाळा, निवासी अभ्यासक्रम पर्यटकांसाठी, पहुण्यांसाठी आयोजित करण्यात येतील व त्यासाठी महामंडळाच्या तर्फे विशेष व्यवस्था करण्यात येईल असे महामंडळाकडून नियोजन करण्यात येणार आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.