waman kendre
मुंबई : मध्य प्रदेश (Madhya Pradesh)शासनाची राष्ट्रीय बैठक असलेली आणि आंतरराष्ट्रीय प्रभाव पाडलेली, वैभवशाली स्वायत्त सांस्कृतिक संस्था म्हणजे भारत भवन भोपाळ (Bharat Bhavan Bhopal). गुरुवारी भारत भवन विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत प्रख्यात नाट्यकर्मी पद्मश्री प्रा. वामन केंद्रे (Waman Kendre) यांची पुढील दोन वर्षांसाठी भारत भवन संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
[read_also content=”पत्रकार सिद्दीकी कप्पन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर https://www.navarashtra.com/india/supreme-court-granted-bail-to-journalist-siddique-kappan-nrsr-323890.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, १९८२ साली स्थापन झालेल्या भारत भवन या संस्थेने अवघ्या काही वर्षातच संपुर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक आदर्श सांसकृतिक संस्था कशी असावी, याचा वस्तुपाठ देशासमोर मांडला. नाटक, संगीत, ललितकला, साहित्य, लोककला, चित्रपट असे महत्त्वाचे विभाग हाताळणारी ही जगावेगळी सांस्कृतिक संस्था आहे. कलेच्या प्रांतात मानदंड स्थापन करून भारतीय कलेला वेगळे आयाम देण्यात यशस्वी ठरलेली ही संस्था आहे. सदर संस्थेचे अध्यक्षपद या पुर्वी अर्जुन सिंग, पुपुल जयकर, सुन्दर लाल पटवा, दिग्विजय सिंह, अशोक बाजपेई, दया प्रकाश सिन्हा, पंडित जसराज, डॉ पद्मा सुब्रमण्यम अशा दिग्गज व्यक्तींनी भूषविले आहे. भारत भावन संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेले प्रा. वामन केंद्रे हे पहिले मराठी कलावंत आहेत.