Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indore Water : जीवनाची किंमत दोन लाख असू शकत नाही…! इंदूर दुषित पाणी प्रकरणावरुन उमा भारती संतापल्या

Indore Water Contamination : इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात पाईपलाईन खराब झाल्यामुळे पिण्याचे पाणी दुषित झाले आहे. यावरुन उमा भारती यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 02, 2026 | 04:03 PM
Former CM Uma Bharti targeted her own BJP party over the water contaminated issue in Indore MP News

Former CM Uma Bharti targeted her own BJP party over the water contaminated issue in Indore MP News

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्य प्रदेशमध्ये दुषित पाण्यामुळे 14 जणांचा बळी
  • 2 लाखांची सरकारकडून मदत जाहीर
  • उमा भारतींनी साधला भाजप नेत्यांवर निशाणा
Indore Water Contamination : मध्य प्रदेश : सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरमध्ये दुषित पाण्याने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 1400 लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण देशातून काळजी आणि रोष व्यक्त केला जात आहे. दरम्या, इंदूरमधील या दुषित पाणी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. यावर सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी त्यांच्याच पक्षाला यावरुन निशाणा साधला असून यासाठी माफी मागितली पाहिजे अशी मागणी उमा भारती यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने त्यांच्याच सरकारवर टीका केली. उमा भारती यांनी या घटनेला त्यांच्या सरकारसाठी लाजिरवाणे म्हटले आणि माफी मागावी लागेल असे म्हटले. उमा भारती यांनी त्यांच्याच नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागले. त्या म्हणाल्या की, “२०२५ च्या अखेरीस दूषित पाणी पिण्यामुळे इंदूरमध्ये झालेल्या मृत्यूंमुळे आपल्या राज्याला, आपल्या सरकारला आणि आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लाजिरवाणे आणि कलंकित वाटले आहे.”

हे देखील वाचा : “जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

मृतांचा आकडा वाढत आहे: उमा भारती

माजी मुख्यमंत्री असलेल्या उमा भारती पुढे म्हणाल्या की, राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेले शहर इतक्या कुरूपतेने, घाणेरड्याने आणि विषारी पाण्याने उद्ध्वस्त झाले आहे, जे अनेक जीव गिळंकृत करत आहे आणि अजूनही गिळंकृत करत आहे. उमा भारती यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या २ लाख रुपयांच्या भरपाईला अपुरे ठरवत पीडितांकडून माफी मागण्याची मागणी केली आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासाठी ही एक कसोटीची वेळ असल्याचे म्हटले.

हे देखील वाचा : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

उमा भारती यांनी क्षमा आणि जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली

उमा भारती पुढे म्हणाल्या की, “एका जीवाचे मूल्य २ लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, कारण त्यांचे कुटुंब आयुष्यभर दुःखात बुडालेले असते. या पापातून मुक्तता मिळवली पाहिजे, पीडितांची माफी मागितली पाहिजे आणि वरपासून खालपर्यंत सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा दिली पाहिजे. मोहन यादव यांच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे.” त्यांनी या ट्विटमध्ये भाजपच्या अधिकृत हँडल आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनाही टॅग केले. त्यामुळे भाजपला त्यांच्याच नेत्याने आरसा दाखवला आहे.

Web Title: Former cm uma bharti targeted her own bjp party over the water contaminated issue in indore mp news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • BJP Politics
  • madhya pradesh
  • water news

संबंधित बातम्या

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
1

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Pooja More : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार
2

Pooja More : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का
3

Maharashtra Municipal Election 2026: निवडणुकीपूर्वीच भाजपचे ४ उमेदवार विजयी; तर शिंदे सेनेला मुंबईत धक्का

Sambhajinagar News: ‘मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं…’; भाजपमध्ये उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांचा उद्रेक, शिवीगाळ अन्….
4

Sambhajinagar News: ‘मी भाजपसाठी सगळं बरबाद करून काम केलं…’; भाजपमध्ये उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांचा उद्रेक, शिवीगाळ अन्….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.