रिपोर्टनुसार,’पंचायत 2’ वेब सीरिजच्या शेवटच्या एपिसोडमध्ये आमदार गावात झालेल्या अपमानानंतर सचिवाची बदली करण्याचा विचार करत असल्याचे दाखवण्यात आलं आहे. आता, तिथूनच कथानक पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. गावात आता गणेश ही व्यक्ती आता नवीन सचिव असणार आहे. ‘पंचायत’च्या पहिल्या सीझनमध्ये “गजब बेइज्जती है” हा संवाद प्रसिद्ध झाला होता. यावर मीम्सचा पाऊस पडला होता. आसिफ खानने गणेश ही व्यक्तीरेखा साकारली होती. “गजब बेइज्जती है” हा संवाद आसिफच्या तोंडी नव्हता. तरीही तो प्रसिद्ध झाला. गणेश हा फुलेरा गावाचा जावई असतो. लग्नाच्यावेळी झालेला कथित अपमान, मुलीकडील लोकांनी गैरसोय करणे अशा वेगवेगळ्या कारणांनी वऱ्हाड नाराज असते. आता, हाच जावई फुलेरा गावचा ‘सचिवजी’असणार आहे.