Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पिल्लू बॅचलर’चं पोस्टर रिलीज, पार्थ भालेरावसोबत अक्षया आणि सायली मुख्य भूमिकेत झळकणार

‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शित होत असून, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

  • By साधना
Updated On: Nov 03, 2023 | 07:26 PM
pillu bachelor

pillu bachelor

Follow Us
Close
Follow Us:

मराठी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे लोकप्रिय झाली. तिचं पाठकबाई हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. अक्षया बराच काळ कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात दिसली नव्हती. मात्र आता अक्षया पुन्हा एकदा ‘पिल्लू बॅचलर’ (Pillu Bachelor) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयासोबत या चित्रपटात सायली संजीवदेखील दिसणार आहे. नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा ‘पिल्लू बॅचलर’ हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शित होत असून, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी दिले आहेत. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे उत्तमोत्तम कलाकार आहेत.

विनोदी अंगानं जाणारी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नावावरून प्रेमकथा असल्याचा अंदाज बाधता येतो, पण तरीही कथा काय असेल यांचं कुतूहल आहे. त्याशिवाय उत्तम कलाकार, दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक, उत्कृष्ट गाणी आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. मात्र त्यासाठी 8 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Web Title: Pillu bachelor poster released nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2023 | 07:25 PM

Topics:  

  • entertainment
  • parth bhalerao

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
2

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!
3

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
4

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.